ठाणे : गेल्या तीन दिवसापासून ठाणे जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार ( Thane Rain ) पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदी, नाले, बंधारे, ओढे, ओहळ भरून वाहू लागले आहेत. उल्हास नदीवरीलही ( Ulhas River ) सर्वच बंधारे भरले आहेत. त्यामुळे ग्रामिण भागातील नागरिकांची माशांना ( Fish ) पकडण्यासाठी मानेवली बंधाऱ्यावर ( Manewali dam) नागरिकांची मोठी झूंबड उडाली आहे. कल्याण - मुरबाड मार्गावरील रायता पुलापासुन ५ मिनिटाच्या अंतरावर हा बंधारा असून मासे पकडण्यासाठी नागरिकांनी बंधाऱ्यावर एकच गर्दी केली आहे.
Ulhas River : उल्हास नदीच्या बंधाऱ्यावर मासेमारीसाठी नागरिकांची झुंबड त्यामुळे मासे खाणाऱ्यांना पर्वणीच -हातात जाळी, पाग घेऊन ग्रामीण भागातील नागरिक शनिवारी व रविवार सुट्टी असल्याने नागरिकांनी वलगणीचे मासेमारी करायला नदी , बांधणाऱ्यावर एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या काळात नदी तलाव बंधारे या ठिकाणी गर्दी करण्यास जिल्हा प्रशासनाकडून मनाई करण्यात आली होती. आता मात्र, कोरोनाचे नियम शिथिल केल्याने ठिकठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू आहे. काहीजण शहरातून गावाकडे मासे पकडण्यासाठी जात आहे. विशेतः पावासाळ्यात साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. त्यामुळे मासे खाणाऱ्यांसाठी हे मासे म्हणजे पर्वणीच ठरली आहे.
हेही वाचा -Assembly Speaker Election 2022 : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी!
वलगणीचे हे मासे खाण्यासाठी खूप चविष्ट -जोरदार पावसानंतर पाणी वाढल्यावर खाडीतील तसेच नदीतील मासे शेतातील साठलेल्या पाण्यात अंडी देण्यासाठी येतात. यालाच उधवण किंवा वलगणीचे मासे असे म्हणतात. वलगणीचे हे मासे खाण्यासाठी खूप चविष्ट असतात. प्रत्येक माशांमध्ये हमखास अंडी असतात. स्थानिक भाषेत गाबोळीवाले मासे म्हणतात. हि गाबोळी किंवा अंडी खवय्ये अतिशय ताव मारुन खातात. त्यामुळेच माशांना खूप मागणी असते. माश्यांच्या अंड्यांना तळून किंवा कालवण करून देखील खातात. वलगणीचे मासे पकडण्यासाठी जाळे, पाग, आदी साधनांचा वापर करतात. दरवर्षी वलगणीचे मासे पकडण्यासाठी जातो.
मासळी बाजारात माशांची आवक वाढली-वलगणीचे हे मासे प्रामुख्याने पोटात अंडी असलेले असतात. पोटात अंडी असलेले मासे चविष्ट असतात. खवय्ये हे मासे मोठ्या चवीने खातात. सध्या असे मासे मोठ्या प्रमाणात तीन दिवसापासून मासळी बाजारात उपलब्ध होत असल्याने खवय्यांना मेजवानी मिळत आहे. गोड्यापाण्यात (गोडी मच्छी) विक्रेत्यांचा धंदा देखील यामुळे तेजीत आला आहे. या माशांची आवक देखील वाढली असून, त्यामध्ये मळे, शिवडा, अरलय, वाम, मळे, कोलंबी, मंगरुळ, शिंगटी, चिवण्या, खवल आदी माशांचा समावेश आहे.
हेही वाचा -Amravati Chemist Murder : उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांबाबत केलेल्या पोस्टमुळेचं; पोलीस उपायुक्तांनी केलं स्पष्ट