पुणे- घटना उत्क्रांत होत असताना प्रथा परंपरा पडायला पाहिजे होत्या, त्या पडल्या नाही म्हणून आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जावे लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय भारतीय लोकशाहीसाठी पोषक असल्याचे मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय भारतीय लोकशाहीसाठी पोषक - उल्हास बापट - घटनातज्ज्ञ उल्हास बापट
घटना उत्क्रांत होत असताना प्रथा परंपरा पडायला पाहिजे होत्या, त्या पडल्या नाही म्हणून आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जावे लागत आहे.
राज्यपालांनी त्यांच्या अधिकारांचा उपयोग बरोबर केला का? या विषयात न्यायालय गेलेले नाही. मात्र, भाजपचा जो विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी वेळ देण्याची मागणी न्यायालयाने मानली नाही. त्यासोबत गुप्त मतदान न करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आजपर्यंत विश्वासदर्शक ठराव नियमित सभापती संमत करून घ्यायचे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आजचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा असल्याचे उल्हास बापट यांनी सांगितले.
हंगामी सभापतींनीच सदस्यांना शपथ आणि विश्वाससदर्शक ठराव संमत करावा, असे निर्देश दिल्याने नव्या परंपरा पडून लोकशाहीला पोषक वातावरण निर्माण होईल, असे मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.