महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ग्रामपंचायत निवडणुकानंतर उद्धव ठाकरे सरकारची झोप उडेल - आशिष शेलार - भाजप नगरसेविका स्नेहा आंब्रे

अटल बिहारी वाजपेयी याच्या जयंतीनिमित्त भाजपच्या नगरसेविका स्नेहा आंब्रे यांच्या वतीने एका सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाजपचे नेते तथा ठाणे प्रभारी आशिष शेलार आले होते.

आशिष शेलार
आशिष शेलार

By

Published : Dec 25, 2020, 9:05 PM IST

ठाणे - राज्यात तीन पक्षाचे सरकार असून हे सरकार जास्त काळ ठिकणार नाही, असे भाजपच्या वतीने वारंवार म्हटले जात होते. आता मात्र 1 वर्ष उलटून देखील ही सरकार काही पडले नाही. दरम्यान, येत्या काही महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकानंतर उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीची झोप उडेल, असे सूतोवाच ज्येष्ठ भाजप नेते आशिष शेलार यांनी आज ठाण्यात केले. अटल बिहारी वाजपेयी याच्या जयंतीनिमित्त भाजपच्या नगरसेविका स्नेहा आंब्रे यांच्या वतीने एका सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाजपचे नेते तथा ठाणे प्रभारी आशिष शेलार आले होते.

खरा हिंदुत्ववादी पक्ष कोणता हे स्पष्ट-

विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर भाजपाने आत्मचिंतन केले असून त्याचे प्रतिबिंब राज्यात लवकरच दिसेल. एकीकडे कायम हिंदुत्वाची कास धरलेल्या शिवसेनेने अजान स्पर्धा घेतली तर दुसरीकडे देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधत ठाणे भाजपातर्फे गीता पठणाची स्पर्धा ठेवल्याने खरा हिंदुत्ववादी पक्ष कोणता हे स्पष्ट झाले, असल्याचे शेलार म्हणाले.

भाजप प्रत्येक निवडणूक लढनार-

दरम्यान येणारी प्रत्येक निवडणूक भाजप बिनधास्त लढवणार असून भाजप विजयाच्या दिशेने वाटचाल करत राहणार आहे. विधानसभा, विधानपरिषद या निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला असला तरी येणाऱ्या निवडणुकीत भाजपा विरोधकांना धूळ चाखल्याशिवाय राहणार नाही. तसेच ग्रामपंचायत निवडणुकानंतर उद्धव ठाकरे सरकारची नक्कीच झोप उडेल, असे शेलार म्हणाले.

हेही वाचा-...अन् चंद्रकांत पाटील म्हणाले मी कोल्हापूरला परत जाणार

ABOUT THE AUTHOR

...view details