महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 13, 2020, 8:11 PM IST

ETV Bharat / city

धार्मिक कामासाठी नोटा हव्या असल्याचे सांगून महिलेची फसवणूक; प्रकरण सीसीटीव्हीत कैद

धार्मिक कामासाठी विशिष्ट नोटांची गरज असल्याचे सांगून दोन चोरट्यांनी एक महिलेची फसवणूक केली आहे. हे प्रकरण सीसीटीव्हीत कैद झाला असून त्या आधारे चोरट्यांचा तपास सुरू.

ठाणे चोरी
ठाणे चोरी

ठाणे - धार्मिक कामासाठी सीएल सिरीयल नंबर असलेल्या नोटा पाहिजे असे सांगून दोन चोरट्यांनी एका दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची 39 हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात गुन्हेगाराविरोधात डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ठगांच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.

धार्मिक कामासाठी नोटा हव्या असल्याचे सांगून महिलेची फसवणूक

मानपाडा रोडवर असलेल्या प्रिमियम पेट्स दुकानात शुभांगी जाधव या नेहमीप्रमाणे काम करत होत्या. बुधवारी सकाळी 11च्या सुमारास 45 ते 50 वयोगटातील एक व्यक्ती दुकानाच्या काउंटरवर येऊन थांबली. त्यांनी जाधव यांच्या हातात पाचशेची नोट देऊन सांगितले की, धार्मीक कामासाठी सीएल सिरियलच्या नोटा पाहिजे आहेत. काऊंटरमध्ये असलेल्या नोटा तपासल्या. मात्र, त्यात सीएल सिरीयलनंबरची नोट नव्हती. त्याचवेळेस दुकानात अंदाजे पंचवीस वर्षाचा तरुण मुलगा आला. त्याने दुकानात पहिल्या आलेल्या व्यक्तीला विचारणा केली. त्याने सांगितले की मला धार्मीक कामासाठी सीएल सिरीयलचा नोटा हव्या आहेत. मात्र, या मॅडम देत नाहीत, तरुणाने दुकानातील महिलेला विनंती केली, की त्यांना देवाच्या कामासाठी नोट हवी आहे. तुमच्याकडे असेल तर द्या. काऊंटरमध्ये चाळीस हजाराचा एक बंडल होता. त्या बंडलमध्ये सिरीयल नंबरच्या नोटा असतील म्हणून त्यांनी तो बंडल चेक करायला लावला. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवून एकाने हात चलाखीने त्या बंडलमधील 39 हजार रुपये लंपास केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून टिळकनगर पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा -प्रत्येक परदेशी उत्पादनावर बहिष्कार घालणे असा स्वदेशीचा अर्थ नव्हे - मोहन भागवत

ABOUT THE AUTHOR

...view details