ठाणे - मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 नोव्हेंबरला काही तासांच्या आताच दोन वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्तींनी फाशी घेतल्याचे समोर आले. त्यात एक 22 वर्षांचा मुलगा असून अन्य घटनेत 27 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली आहे.
मिरारोड पोलीस ठाणे परिसरातील गोकुळ व्हिलेज भागात पालिकेच्या महावीर उद्यानात राहुल यादव (वय २२) या युवकाने आत्महत्या केली आहे. अद्याप त्याच्याकडून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.
मिरारोड परिसरात एकाच दिवशी दोन आत्महत्येच्या घटना - suicides in thane
मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 नोव्हेंबरला काही तासांच्या आताच दोन वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्तींनी फाशी घेतल्याचे समोर आले. त्यात एक 22 वर्षांचा मुलगा असून अन्य घटनेत 27 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली आहे.
मिरारोड परिसरात एकाच दिवशी दोन आत्महत्येच्या घटना
तर दुसरी घटना ही शांती पार्क परिसरातील असून 27 वर्षांच्या एका तरुणीने स्वत:चे जीवन संपवले आहे. संबंधित तरुणी तिच्या प्रियकरासोबत 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहात होती. तिने स्वत:च्या राहत्या घरीच गळफास घेतला. दोन्ही प्रकरणांतील आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही. याप्रकरणी मिरारोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदिप कदम यांनी दिली आहे.