ठाणे : दुचाकी वरून जाणाऱ्या प्रवाशाचा पाठलाग करत त्यांच्या डोळ्यात गरम मसाल्याची पुड टाकून लुटणाऱ्या (Robbers threw masala powder in eyes arrested) दोघांना भिवंडीतील नारपोली पोलिसांना दीड महिन्यानंतर बेड्या ठोकल्यात यश (Passenger Robbers Arrested Thane) आले आहे. मिनाजुल फैजुल हक (वय २५), शरीमुद्दीन अन्वरउद्दीन रेहमान (वय २३) असे बेड्या ठोकलेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना ५ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी अनिल शंकरलाल पहुजा ( वय ५१, रा.लुईसवाडी,ठाणे.) यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. (Robbers threw masala powder in eyes arrested)
सापळा रचून केली अटक - या गुन्ह्याच्या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्याचे वपोनि मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन पाटील यांनी पोलीस निरीक्षक (प्रशा) राजेश वाघमारे,पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी जाधव,पोह सुशिल इथापे,समीर ठाकरे,राजेश पाटील,पोना संदीप जाधव,पोशि जनार्दन बंडगर,विजय ताटे या पोलीस पथकासह तांत्रिकरित्या तपास सुरू केला होता. दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत दोघा आरोपी पैकी एकजण भिवंडीतील काल्हेर भागात येणार असल्याची खबर चेतन पाटील यांना मिळाली, या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून मिनाजुल फैजुल हक याला ताब्यात घेऊन अटक केली.