ठाणे:कल्याण एन एक्स या हायप्रोफाईल गेस्ट हाऊसच्या बंद खोलीत आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात सट्टेबाजांवर गुन्हा दाखल करून दोघा बुकींना बेड्या ( Two bookies arrested ) ठोकल्या आहेत. भावीन शामजी अनम आणि मयूर हरीश व्यास, असे अटक करण्यात आलेल्या क्रिकेट बुकींची नावे आहेत.
ऑनलाईन लाखोंचा सट्टा -आयपीएल किक्रेट मॅचचा हंगामा सुरु होताच किक्रेट बुकींसह सट्टा लावणारे सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. चार दिवसापूर्वी उल्हासनगर मधील एका मोबाईल शॉपमध्ये, चोरीछुपे आयपीएल मॅचवर सट्टा ( Betting on IPL matches ) घेणाऱ्या चार बुकींना लाखोंच्या मुद्देमालासह अटक केले होते. ही घटना ताजी असतानाच कल्याण रेल्वे स्थानकासमोरील कल्याण एन एक्स या हायप्रोफाईल गेस्ट हाऊसच्या एका बंद खोलीत चोरीछुपे, आयपीएल मॅचवर सट्टा सुरु असल्याची माहिती महात्मा फुले ( Mahatma Phule Police Station ) पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर ५ मार्च रोजी सायंकाळी याठिकाणी छापेमारी केली असता, बंद खोलीत आयपीएल मधील आरसीबी विरुद्ध आरआर ( RCB vs RR ) यांच्या सामना वेळी ऑनलाईन लाखोंचा सट्टा सुरू असल्याचे आढळून आले.