ठाणे:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघे मृतक भाऊ भिवंडी शहरातील विठ्ठलनगर भागात असलेल्या एका इमारतीमध्ये कुटूंबासह राहत होते. ते त्यांच्या नातेवाईकांसोबत भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथील वारणा नदी पात्रात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पोहण्यासाठी गेले. मात्र नातेवाईकांसोबत नदी पात्रात पोहत असताना इमरानला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्यामुळे सुफियान त्याला वाचवण्यासाठी गेला. मात्र दोघेही खोल पाण्याच्या प्रवाहात बुडाले.
Two Brothers Drowned In River : पिकनिकला गेलेल्या दोन भावांचा नदी पात्रात बुडून मृत्यु - drowned in a river
नातेवाईकांसोबत नदीवर पिकनीक साठी गेलेले दोघे सख्ये भाऊ (Two brothers who went on a picnic) पोहण्यासाठी नदी पात्रात उतरले मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघा सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ( drowned in a river) इम्रान रईस मन्सूरी (२०) आणि सुफीयान रईस मन्सूरी (१६) अशी त्या सख्ख्या भावांची नावे आहेत.
दोन भावांचा नदीत बुडून मृत्यू
दोघे भाऊ बुडत असल्याचे पाहून नातेवाईकांनी आरडाओरड केली असता स्थानिक ग्रामस्थांनी दोघांना पाण्याबाहेर काढून तोंडावाटे शरीरात पाणी गेल्याने दोघांना उपचारासाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. या घटनेने मन्सूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.