ठाणे -किरकोळ कारणावरून मनात राग धरून दोघांनी मोहमद जैद मंजूर खान (३०) यांच्यावर चाकूने हल्ला करून पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना राबोडीत मंगळवारी घडली. या हल्ल्यात खान गंभीर जखमी झाले असून, गोळी चुकल्याने ते थोडक्यात बचावले आहेत. याप्रकरणी संशयित शबीर अब्दुल गौस (३०) आणि मोहन मल्लेश माचराला यांना राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न व हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
खान हे नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतात. ते त्यांचा मित्र इम्रान खान उर्फ बंटी यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. त्याचाच रागशबीर याच्या मनात होता. शबीर हा खान यांना त्यांच्यासोबत राहण्यास सांगत असे. दरम्यान , मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास खान राबोडीतील रफ्तार हाऊसजवळील तपासेनगर या ठिकाणी आपल्या मित्रांसोबत बसलेले होते. त्याचवेळी शबीर त्याच्या एका साथीदारासह मोटारसायकलवरून तिथे आला. शबीरने त्यांना जखमीवर उपचार आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मोहम्मद जेंद मंजूर खान हे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले.