ठाणे -ठाण्यात पुन्हा एकदा मोबाईल चोरांमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्टेशनजवळ एका मोबाईल चोरट्यासोबत झालेल्या झटापटीत एका महिलेचा लोकलखाली पडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना याच घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती घडली आहे. पण यावेळी ही घटना रस्त्यावर घडली. रिक्षाने एक महिला प्रवास करत असताना अचानक दोन बाईकस्वार येतात. बाईकवर मागे बसलेला महिलेच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करतो. पण महिला तो मोबाईल पकडण्याचा प्रयत्न करते. या झटापटीत महिला ही चालत्या रिक्षातून खाली पडते. त्यातच तिला उपचारा दरम्यान मृत्यू होतो. मृत महिलेचं नाव कन्मिला रायसिंग असं असून ती 27 वर्षांची होती.
मोबाईलपायी रिक्षातील तरुणीच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या दोघा दुचाकीस्वारांना नौपाडा पोलिसांनी २४ तासात अटक केली.अल्केश उर्फ परवेझ अन्सारी (२०) व सोहेल अन्सारी (१८) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही भिवंडीतील राहणारे आहेत. दोघेही सराईत मोबाईल चोरटे असुन त्यांच्याविरोधात कोनगाव व नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडुन मृतक तरुणीच्या मोबाईलसह तीन मोबाईल, रोकड व एक दुचाकी हस्तगत केली असुन ठाणे सत्र न्यायालयाने दोघांनाही ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.
मोबाईल सुरू केला आणि आरोपी मिळाले