ठाणे - ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात २३ जुलै २०२१ रोजी दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यात ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सहकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटीची खंडणीची मागणी केल्याच्या तक्रारीनंतर कोपरी पोलिसांनी गुन्ह्यातील संजय पुनमीया आणि सुनील जैन यांना अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठाणे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर व मणेरे यांच्यासह सहा आरोपींवर कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९, ४२०, ३६४ ए, ३४, १२० बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यातील आरोपी संजय पुनमीया आणि सुनील जैन यांना कोपरी पोलिसांनी मुंबईमधून अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.