महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंब्रा येथे व्यापाऱ्याला खंडनी मागणाऱ्या दोघांना अटक - demanding ransom

मुंब्रा येथील एका व्यापाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.

खंडनी मागणाऱ्या दोघांना अटक
खंडनी मागणाऱ्या दोघांना अटक

By

Published : Jan 3, 2021, 7:36 PM IST

ठाणे - मुंब्रा येथील एका व्यापाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. हे लाचलुचपत प्रतिबंधित विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून खंडणी मागत होते. अलमदर पुन्जा आणि जयेश सोनावणे, असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक मधुकर कड

एक लाख रुपयाची मागणी-

मुबशीर शेख यांचे रशिद कम्पाउंड येथील हशमत चौकात सुपारी विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री या दुकानात जाऊन अलमदर पुन्जा आणि जयेश सोनावणे यांनी ते नवी मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधित विभागातील अधिकारी असल्याचे शेख यांना सांगितले. तसेच तुमच्या दुकानामध्ये गुटख्याची विक्री होत असल्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. यातून वाचायचे असल्यास एक लाख रुपये द्या, अशी मागणी केली.

याबाबत शेख यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांना अटक केली. अंगझडती मध्ये त्यांच्याकडे बृहन्मुंबई महापालिकेच्या स्वच्छता आणि आरोग्य विभागाचे तसेच नॅशनल सिक्युरिटी आणि करशंन क्राईम प्रिवेन्टिव्ह ब्रिगेडची ओळखपत्र आढळून आली.

हेही वाचा-देशात दोन कोरोना लसींना मान्यता देणारे औषध महानियंत्रक परभणीचे भूमिपुत्र !

हेही वाचा-औरंगाबादच्या नामांतरावरून प्रवीण दरेकरांची शिवसेनेवर टीका

ABOUT THE AUTHOR

...view details