ठाणे -जगातील २७ ऐतिहासिक स्थळे व त्यांची माहिती, जिल्हे, राजधानी, एक ते १०० इंग्रजी अंक, फळे, भाज्या, फुले ओळखणे, राष्ट्रगीत हे सगळे अचूकपणे अडीच वर्षाचा ठाण्यातील एक मुलगा सांगतो. हे वाचून खरे वाटत नाही ना! ही गोष्ट आहे ठाण्यात राहणाऱ्या प्रयाण सोनकुसरे याची. ज्या वयात नीट बोलता येत नाही, त्या वयात एवढी माहिती सांगणे म्हणजे अजबच. चिमुकल्या प्रयाणच्या या बुद्धिमतेची दखल 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'ने घेतली आहे.
हेही वाचा -आंबिवली रेल्वे स्थानकात फेरीवाल्याकडून पोलिसाला बेदम मारहाण
प्रयाण सोनकुसरे याची बुद्धिमत्ता अफाट आहे. तो समोरच्याला त्याच्या बुद्धिमत्तेने अचंबित करतो. जिल्हे, राजधानी आदींबरोबरच ४० प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, मराठी अंक ओळख, विविध ११ शोधकर्ते त्यांची नावे व काम, २७ स्वातंत्र्य सैनिकांची नावे, इंग्रजी अक्षरे ओळखणे, ४४ देशांचे नकाशे व त्यांची वैशिष्ट्ये प्रयाण अचूक सांगतो. त्याच्या या गुणांची दखल इंडिया बुक ऑफ रेकार्डने घेतली असून, त्याचे नाव रेकॉर्डवर घेतले आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डतर्फे प्रयाणला प्रशस्तिपत्रक आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
लॉकडाऊनचा फायदा