महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पनवेल महापालिका क्षेत्रात 23 नवे कोरोनाबाधित वाढले;21 जण कोरोनामुक्त - पनवेल लेटेस्ट न्यूज

शनिवारपर्यंत पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण ४९६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ३०३ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

panvel corona update
पनवेल कोरोना अपडेट

By

Published : May 31, 2020, 5:06 PM IST

नवी मुंबई- पनवेल महापालिका क्षेत्रात शनिवारी २३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. २१ रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

२३ रूग्णांमध्ये कामोठ्यातील ८, कळंबोलीतील ६, तर रोडपालीमध्ये २, पनवेलमधील ३ तर खारघरमधील ओवेपेठ येथील एकाच कुटुंबातील तिघांसह सेक्टर १५ मधील एका रूग्णाचा समावेश आहे. हा रूग्ण काल २९ मे रोजी पुर्णपणे बरा झाला आहे. परंतु या रूग्णाची माहिती संबंधित हॉस्पिटलमधून आज मिळाल्याने नवीन रूग्णांमध्ये नोंद करण्यात आल्याचे पनवेल महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

शनिवारपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण ४९६ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ३०३ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. २२ जणांचा मृत्यू झाला असून १७१ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत.

पनवेल महापालिका हद्दीतील २१ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये कळंबोलीतील ८ कामोठ्यातील ७, खारघरमधील ६ रूग्णांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details