महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे २१ नवे रुग्ण; २३ जण कोरोनामुक्त - कोरोना केसेस इन पनवेल

पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये मंगळवारी 21 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळे रुग्ण संख्या १०३७ वर पोहोचली. आतापर्यंत ७३२ जण कोरोनामुक्त झाले असून ४६ जणांचा मृत्यू झाला आहे.

Panvel Corona Update
पनवेल कोरोना अपडेट

By

Published : Jun 17, 2020, 10:36 AM IST

Updated : Jun 17, 2020, 11:11 AM IST

नवी मुंबई- पनवेल महापालिका क्षेत्रात मंगळवारी २१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कामोठ्यातील ६४ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये नवीन खारघरमधील ६, कामोठ्यातील ५, पनवेलमधील ४, कळंबोलीतील २ तळोजा येथील २ , तसेच खिडूकपाडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, मंगळवारपर्यंत पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०३७ पोहोचली आहे. यापैकी ७३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या २५९ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पनवेल महापालिका क्षेत्रातील २३ जणांना डिस्चार्ज

मंगळवारी पनवेल महापालिका क्षेत्रातील २३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये कामोठ्यातील ८, खारघरमधील ६, कळंबोलीतील ४, नवीन पनवेलमधील ४ तसेच पनवेलमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

Last Updated : Jun 17, 2020, 11:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details