महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नव्याने २९ रुग्ण ; एकाचा मृत्यू - कल्याण डोंबिवली कोरोना बातमी

रोज आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये एका तरी अल्पवयीन मुलाचा समावेश असायचा. मात्र, आज एकाही अल्पवयीन मुलामुलींचा रुग्णांमध्ये समावेश नसल्याचे समोर आले आहे, तर आजही रुग्णामध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण डोंबिवली परिसरात राहणारे आहेत.

Kalyan Dombivali Corporation
कल्याण डोंबिवली महापालिका

By

Published : May 28, 2020, 8:51 PM IST

ठाणे- कल्याण डोंबिवलीत आज नव्याने २९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे, तर आजच्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेकडील राहणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज नव्याने आढळून आलेल्या रुग्णांची नोंद पाहता कोरोना महापालिका हद्दीतील बाधितांचा आकडा साडे आठशे पेक्षा अधिकवर जाऊन पोहोचला आहे, तर आतापर्यंत २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे २९७ रुग्णांना आतापर्यत डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत ५८७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

रोज आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये एका तरी अल्पवयीन मुलाचा समावेश असायचा. मात्र, आज एकाही अल्पवयीन मुलामुलींचा रुग्णांमध्ये समावेश नसल्याचे समोर आले आहे. तर आजही रुग्णामध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण डोंबिवली परिसरात राहणारे आहेत. त्याखालोखाल कल्याण पूर्वेत भागात राहणारे आहेत. कल्याण पश्चिम परिसरात सर्वात कमी संख्या रुग्णांची आहे. मात्र, डोंबिवली पूर्व परिसरातही बाधित रुग्णांच्या संपर्क येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details