महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाण्यात डान्सबार प्रकरणात ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाण्यात अवैध डान्स बार प्रकरणात आता सर्व विभागात कारवाया झाल्यानंतर अनेकवर्ष एकाच विभागात स्थानापन्न असल्याने या प्रशासकीय बदल्या असल्याची माहिती दिली. ठाणे महानगर पालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या असून एकप्रकारे अनधिकृत बांधकामांना रोखण्यासाठी पालिका प्रशासन अपयशी ठरले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ठाणे महानगर पालिका
ठाणे महानगर पालिका

By

Published : Jul 23, 2021, 10:14 PM IST

ठाणे - पालिकेच्या विविध प्रभाग समिती आणि मुख्यालयातील उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. ठाण्यात अवैध डान्स बार प्रकरणात आता सर्व विभागात कारवाया झाल्यानंतर अनेकवर्ष एकाच विभागात स्थानापन्न असल्याने या प्रशासकीय बदल्या असल्याची माहिती दिली. ठाणे महानगर पालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या असून एकप्रकारे अनधिकृत बांधकामांना रोखण्यासाठी पालिका प्रशासन अपयशी ठरले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे कळव्यातील घोलाई नगर येथे दरड कोसळली होती, यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. त्यांनतर अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरम्यान कोरोना काळात शहरात राजरोसपणे सुरू असलेले डान्स बार प्रकरण समोर आले असल्याने पालिका अधिकरी नेमके काय करतात असा प्रश्न उपस्थित झाल्या नंतर पालिका आयुक्त शर्मा यांना उशिरा का होईना पण जाग आली असून त्यानंतर आता पालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

पालिका उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्याकडे महत्त्वाचा समजला जाणारा अतिक्रमण विभाग होता, आता त्याच्या कार्यभार अश्विनी वाघमळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच 7 सहाय्यक आयुक्तच्या इतर प्रभाग समिती पदी बदली करण्यात आली आहे. यामध्ये उथळसर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त पदी महेश आहेर, प्रणानी भोंगे कळवा प्रभाग समिती, सचिन बोरसे यांना वर्तक प्रभाग समिती, अनुराधा बाबर यांची लोकमान्य नगर-सावरकर नगर प्रभाग समिती, कल्पिता पिंपळे यांची माजीवडा मानपाडा प्रभाग समिती तर अल्का खैरे यांची दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

अदला-बदली मुळे काय होणार?

शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे अनेक राजकीय पक्षांनी आंदोलने केली, आवाज उठवला होता. त्यानंतर पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या जरी केल्या असतील तरी या बदल्यामुळे नेमके काय साध्य होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता महिला अधिकाऱ्याकडे अनधिकृत बांधकाम रोखण्याची धुरा दिल्यावर काय बदल होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details