महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

व्हिडिओ : मुंबई-नाशिक महामार्गावर बर्निंग कारचा थरार - कारने पेट घेतल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर कोंडी

खारेगाव टोलनाक्याजवळ आज रात्री कार पेटल्याची घटना घडली.

पेटलेली कार

By

Published : Sep 21, 2019, 11:57 PM IST

ठाणे -मुंबई-नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाक्याजवळ आज (शनिवारी) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्यामध्येच कार पेटल्याची घटना घडली.

कारने पेट घेतल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर कोंडी

हेही वाचा -फुरसुंगीत महावितरणाच्या रोहित्राला मध्यरात्रीच्या सुमारास आग

अरुण सिदाम यांची ही कार असून ते ठाण्याहून नाशिककडे निघाले होते. कारने पेट घेतल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथकाने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी आगीत गाडी पूर्णतः खाक झाली आहे.

दरम्यान,या दुर्घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, अशी माहिती आपत्कालीन कक्षाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details