ठाणे- मागील तीन दिवसांपासून मोठ्या संख्येने कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा आकडा रोज वाढत आहे. शुक्रवारी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळल्याने ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 611 वर पोहचला आहे. ठाण्यात कोरोनाचा गुणाकार होत असल्याची धोक्याची घंटा वाजत आहे.
गुरुवारी कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 560 वर असतानाच शुक्रवारी तब्बल 51 नवे रुग्ण आढळल्याने एकदा 611 पार झालेला आहे. शुक्रवारी माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीत गुरुवारपर्यंत 30 रुग्ण आढळले होते. तर शुक्रवारी मात्र 3 रुग्ण आढळल्याने आकडा 33 वर गेला. . वर्तकनगर प्रभाग समितीत गुरुवार पर्यंत 42 रुग्ण आढळले होते. तर शुक्रवारी मात्र एकही रुग्ण या प्रभाग समितीत आढळला नाही. लोकमान्य नगर-सावरकर नगर प्रभाग समितीत आतापर्यंत गुरुवारी कोरोना रुग्णांचा आकडा 141 वर होता. शुक्रवारी 15 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे. या प्रभाग समितीत रुग्णांची संख्या 156 वर पोहचली. नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत गुरुवार पर्यंत 58 रुग्ण होते. त्यात शुक्रवारी 2 रुग्णांची भर पडली रुग्णांची संखया 60 वर पोहचली आहे. उथळसर प्रभाग समितीत गुरुवारपर्यंत 48 एवढे रुग्ण होते. शुक्रवारी एकही रुग्ण आढळला नाही. वागळे प्रभाग समितीत रुग्णांचा आकडा 96 वर होता. त्यात शुक्रवारी 14 रुणांची भर पडल्याने आकडा शंभरी पार 110 वर पोहचला.