ठाणे - सध्या सत्तेने पुरस्कृत दहशतवाद रोखण्यासाठी गांधी आणि भगतसिंग समाजाला कळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक चमनालाल यांनी केले. महात्मा गांधी, भगतसिंग, डॉ. आंबेडकर, नेहरू यांच्यासारखी व्यक्तिमत्व अभ्यासणे हाच इतिहासाचे विद्रुपीकरण रोखण्याचा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आणि कॉम्रेड भगतसिंग यांच्या 114 व्या जयंती निमित्त दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्राध्यापक चमनालाल यांचे व्याख्यान कल्याणच्या कॉम्रेड दत्ता देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आले होते. सध्याचा काळ हा ब्रिटिश सत्तेपेक्षाही कठीण असून, मॉब लिंचींग, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यासारख्या विचारवंतांचे खून सर्रास घडत आहेत, असे ते म्हणाले. तसेच आज समाजात वैचारिक गोंधळाचे वातावरण असून, सत्तेवर बसलेलेच ते पसरवण्यात आघाडीवर असल्याची टीका प्राध्यापक चमनालाल यांनी केली.
हेही वाचा भिवंडीतील तीनही मतदारसंघात भाजपच्या बंडखोरांमुळे आघाडीचा डंका