ठाणेश्रावण महिना सरता सरता शहरातून गल्लोगल्ली ढोलकीचे आवाज ऐकू आले की, गणपतीच्या आगमनाची चाहूल लागत असते. परंतू अलिकडे स्वस्त आणि मस्त या ऑनलाईन खरेदी करण्याकडे, ग्राहकांचा जास्त कल असतो. अनेक वर्षांपासुन वाद्य दुरुस्त repair traditional musical instruments करणाऱ्या, वाद्य कारागिरांवर Musical instrument craftsman उपासमारीची वेळ time of starvation आली आहे, अशी खंत ठाण्यातील अर्जुन गुंड आणि त्यांची पत्नी अलका यांनी व्यक्त केली. Families repairing traditional instruments
प्रतिक्रीया व्यक्त करतांना गुंड कुटुंबीय कुटुंब चालवायचे तरी कसे?१९८९ पासून म्हणजे जवळपास ३३ वर्षाेंपासुन आम्ही हा व्यवसाय करत आहे. आधीच कोरोना काळात सण उत्सव साजरे करण्यावर बंदी होती. त्यामुळे हाताला काही काम नव्हते. तर आता सण उत्सवांवरील निर्बंध मुक्त केले आहेत आणि गणपती चार दिवसांवर येऊन ठेपले आहेत, तरी ग्राहक नाहीत. तुमच्या कडे ऑनलाईन पेक्षा वाद्ये महाग आहेत, अशी तक्रार करीत ग्राहक खरेदी करत नाही. त्यातच जीएसटी मुळे महागाईत भर पडली आहे. त्यामुळे कुटुंब चालवायचे तरी कसे? असा प्रश्न आमच्यासमोर उभा असल्याचे अलका सांगतात.
ढोलकीचा गोडवा डिजीटल वाद्यामधून कसा घुमणार?खरे तर गणेशोत्सव म्हणटले की पारंपारिक वाद्यावर आरती,भजनाचा लयबद्ध ठेका धरला जातो. परंतू आता मोबाईल म्युझिक सिस्टिम वर आरती लावून वाजविण्यात येते. पण तबला, पेटी, झांज, ढोलकी याचा नाद काही वेगळाच असतो, त्याचा गोडवा या डिजीटल वाद्यामधून कसा घुमणार? असा प्रश्न वाद्य व्यावसायिक करत आहेत.
साहित्य महागले उत्पन्न घटलेएखादी वस्तू खराब झाल्यानंतर, ती दुरुस्त केली जाते आणि याच दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या अनेक कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. कारण आता दुरुस्त करण्यापेक्षा, एखादा वाद्य खराब झाल्यानंतर ते टाकून देऊन, नवीन घेण्याकडे कल वाढत आहे. आणि त्यामुळे देखील हे कुटुंबीय हवालदिल आहेत. त्यासोबत वाद्य दुरुस्त करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची किंमत ही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे दुरुस्ती करून मिळणारे उत्पन्न देखील घटत आहे. त्यामुळे आता या अनेक अडचणीत सापडलेल्या दुरुस्ती कामगारांना सरकारी मदतीची अपेक्षा आहे.Families repairing traditional instruments
हेही वाचाGanesh Chaturthi 2022 गणेश उत्सवानिमित्त बाजारपेठ फुलली, विविध साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी