महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Three Youth Drowned At Kalamb Beach: कळंब समुद्रकिनारी तीन तरुण बुडले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचविण्यात यश - भरतीमुळे तिघे खोल समुद्रात खेचले गेले

नालासोपाऱ्यामध्ये तीन तरूण पर्यटकांचा कळंबच्या समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला ( Three young tourists drown At Calamba Beach )आहे. वसईच्या गावराई पाडा येथील रोहित यादव (२०) आणि राममंदिर येथील आझाद चाळीत राहणारा राहुल राजभर (२०) या दोघांना वाचविण्यात यश आले तर जोगेश्वरी येथे राहणाऱ्या राजन मौर्या याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला . या बाबतचा पुढील तपास अर्नाळा पोलीस करत आहेत.

Kalamb Beach
कळंब समुद्रकिनारा

By

Published : Aug 4, 2022, 11:47 AM IST

नालासोपारा -नालासोपारामधील कळंबच्या समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेले तीन तरुण पर्यटक बुडल्याची ( Three young tourists drown At Calamba Beach ) घटना समोर आली आहे. यातील दोन तरुणांचा जीव वाचविण्यात यश आले असून दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला ( one died two saved ) आहे. त्यामुळे कळंबच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे समुद्र किनाऱ्यावर काहीकाळ चिंतेच वातावरण निर्माण झाले होते.

कळंब समुद्रकिनारा

पाण्यात आंघोळीसाठी गेले -पर्यटनासाठी आलेलेतिनही तरुण आंघोळीसाठी समुद्राच्या पाण्यात गेले. पण त्यावेळी असलेल्या भरतीचा अंदाज न आल्याने ते तिघे खोल समुद्रात खेचले गेले ( pulled into sea due to tide ) . हे तरुण समुद्रात ओढले जात असल्याचे पाहून कळंब येथील अनिकेत नाईक व निखिल निजाई यांनी खोल समुद्रात जाऊन स्वताच्या जिवाची पर्वा न करता दोन तरुणांचा जीव वाचवला. यात दोन तरूणांना वाचवण्यात त्यांना यश मिळाले. तर एका तरुणाचा दुपारी एकच्या सुमारास मृत्यू झाला. राजन मौर्या असे मृत तरूणाचे नाव आहे. समुद्र किनाऱ्यावर त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

अर्नाळा पोलीसांकडून तपास सुरू -वसईच्या गावराई पाडा येथील रोहित यादव (२०) आणि राममंदिर येथील आझाद चाळीत राहणारा राहुल राजभर (२०) या दोघांना वाचविण्यात यश आले तर जोगेश्वरी येथे राहणाऱ्या राजन मौर्या याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला . या बाबतचा पुढील तपास अर्नाळा पोलीस करत आहेत.

हेही वाचा -ईडीच्या 'या' कारवाईवर काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी, संसदेत गदारोळ होण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details