महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

यूट्यूबवर पाहून छापल्या बनावट नोटा; भिवंडीच्या शांतीनगरात त्रिकुट गजाआड - बनावट नोटा बातमी

भिवंडी शहरात बनावट नोटा तयार करून चलनात आणण्याच्या इराद्याने कार्यरत असणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर कल्याण-भिवंडी मार्गावरील साईबाबा मंदीर परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा दुसऱ्या व्यक्तीस देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता वरिष्ठ पो. निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सापळा लावून आरोपी अहमद याला ताब्यात घेण्यात आले.

By

Published : Sep 25, 2021, 8:55 PM IST

Updated : Sep 25, 2021, 9:08 PM IST

ठाणे -भारतीय चलनातील बनावट नोटा छापून त्या बाजारात वटविणाऱ्या तिघांना भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कॉम्प्युटर सायन्सच्या विषयात पदवीधर असलेल्या आरोपीने यूट्यूबवर बघून नोटा छापण्याचा कारखाना गेल्या ६ महिन्यापासून सुरू असल्याचे पोलीस तपास समोर आले आहे. अहमद नाजम नाशिककर (वय 32), मोहम्मद शफीक अश्फाक अहमद अन्सारी (वय 35) आणि चेतन एकनाथ मेस्त्री (वय 41) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अटक आरोपी चेतन हा कॉम्प्युटर सायन्सच्या विषयाचा पदवीधर आहे.

सापळा रचून केली आरोपीला अटक

विविध गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असतानाच भिवंडी शहरात बनावट नोटा तयार करून चलनात आणण्याच्या इराद्याने कार्यरत असणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर कल्याण-भिवंडी मार्गावरील साईबाबा मंदीर परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा दुसऱ्या व्यक्तीस देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता वरिष्ठ पो. निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सापळा लावून आरोपी अहमद याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील एक लाख किंमतीच्या 500 दराच्या बनावट नोटा जप्त केल्या.

बनावट नोटासह साहित्य जप्त

आरोपी अहमदला ताब्यात घेऊन त्याच्याकडे बनावट नोटा बाबत चौकशी केली असता त्याने 2 साथीदारांच्या मदतीने बनावट नोटाचा छोटा छापखाना सुरू केल्याची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने मोहम्मद शफीक अश्फाक अहमद व चेतन या दोघांही अटक करीत त्यांच्या ताब्यातून 1 लाख 19 हजार 500 किंमतीच्या 500 रुपये दराच्या भारतीय बनावट नोटा जप्त केल्या. आरोपीकडून बनावट नोटा बनविण्यासाठी लागणारे लॅपटॉप, प्रिंटर, लॅमिनेटर, तयार करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर, प्रिंटिंगचे कागद, अर्धवट प्रिंट केलेल्या रु 500 व 100 दराच्या नोटा असा एकूण 2 लाख 70 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत तिन्ही आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Last Updated : Sep 25, 2021, 9:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details