महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Meera Bhynder Crime : आमदार गीता जैन यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तीन जणांना अटक - खंडणी मागणाऱ्या तीन जणांना अटक

मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघाच्या (Meera Bhynder Constituency) अपक्ष आमदार गीता जैन (Geeta Jain) यांनी विधवा महिलांचा लग्न सोहळा ठेवला असे सांगून फसवणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

Kahimira police
Kahimira police

By

Published : Dec 23, 2021, 11:44 AM IST

मीरा भाईंदर - मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघाच्या (Meera Bhynder Constituency) अपक्ष आमदार गीता जैन (Geeta Jain) यांनी विधवा महिलांचा लग्न सोहळा ठेवला आहे. त्यासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी एका हॉटेल व्यावसायिकाला करण्यात आली.

आमदार गीता जैन

काशीमिरा परिसरातील दिल्ली दरबार हॉटेलचे (Delhi Darbar Hotel) व्यावसायिककडे दिनांक २० डिसेंबर सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास एक व्यक्ती आली. त्यांनी मोबाईल द्वारे आमदार गीता जैन यांच्याशी बोला त्यांनी एक कार्यक्रम ठेवला आहे असे खोटे सांगून एका महिलेशी बोलणे करून दिले. त्यावेळी हॉटेल व्यावसायिक यांना संशय आला त्यांनी परस्पर आमदार जैन यांना संपर्क केला. तेव्हा जैन यांनी असा कोणताही कार्यक्रम आम्ही ठेवला नसल्याचेही सांगितले.

एका महिलेसह दोन व्यक्तींना अटक
आ.गीता जैन यांनी तात्काळ काशीमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांना माहिती दिली. यावेेल हॉटेल दिल्ली दरबारला भेट देऊन संबंधित पैसे मागणाऱ्या व्यक्तीला अटक केली. चौकशी केली असता यामध्ये अधिक एक व्यक्तीसह महिला सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी बनावट आवाज काढणाऱ्या महिलेसह त्या व्यक्तीला अटक केली. संबंधित व्यक्ती विरोधात पोलिस ठाण्यात दिनांक(२१) मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती काशीमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.

हेही वाचा -Jewellry businessman killed in Washim: वाशिममध्ये हवेत गोळीबारासह चाकूने वार करून लुटले; सोने व्यापाऱ्याचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details