ठाणे -पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना मुंबईसह महाराष्ट्रातून हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवारी चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत महामोर्चाचे आयोजन केले आहे. पक्ष पातळीवर तयारी केल्यानंतर आता मनसेने मोर्चा यशस्वी करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. या साठीच मोटरसायकल ध्वज रॅली काढण्यात आली होती. या मोटरसायकल रॅलीत मनसे समर्थक सहभागी झाले होते.
ठाणे, पालघर जिल्ह्यातून ३० हजार मनसे कार्यकर्ते गाठणार मुंबई.. ध्वज रॅली काढून शक्ती प्रदर्शन - MNS march in Mumbai on Sunday
मनसेच्या वतीने रविवारी चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी ठाणे, पालघर जिल्ह्यातून ३० हजार मनसे कार्यकर्ते मुबंईत दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

ठाणे पालघर जिल्ह्यातून ३० हजार मनसे कार्यकर्ते गाठणार मुंबई, ध्वज रॅली काढून केले शक्ती प्रदर्शन
ठाणे पालघर जिल्ह्यातून ३० हजार मनसे कार्यकर्ते गाठणार मुंबई, ध्वज रॅली काढून केले शक्ती प्रदर्शन
रवीवारी निघणाऱ्या मोर्चामध्ये अनेक ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला असून ठाणे पालघर जिल्ह्यातून सुमारे ३० हजाराच्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.