ठाणे - सुरुवातीच्या काळातील चुल आणि मुलं याच सीमेत न राहता अनेक महिला उच्च शिक्षण घेऊन चांगल्या हुद्द्यावर नोकरीला जाऊ लागल्या आहेत. ( The story of Amrit Mahotsav ) तर, ज्या महिलांना शिक्षण घेता आले नाही त्या स्वतःचा व्यवसाय करुन किंवा मिळेल ते काम करुन आपल्या संसाराचा गाडा पुढे नेत आपल्या पायावर खंबीरपणे उभ्या राहत आहेत. अशीच काहीशी कहाणी आहे ठाण्यातील पहिल्या महिला रिक्षा चालक अनामिका भालेराव यांची-
अनामिका या ठाण्यातील पहिल्यांदा महिला रिक्षा चालक - अनामिका भालेराव यांनी 2012 साली रिक्षाच स्टेरिंग हातात घेत ठाण्यातील रस्त्यांवर रिक्षा चालवायला सुरुवात केली. अनामिका यांचे पती अविनाश भालेराव हे देखील रिक्षा चालकच, घरची परिस्थिती हालाकीची त्यात मुला मुलींचं शिक्षण त्यामुळे पती अविनाश यांनी कमवून आणलेले पैसे हे अपुरे पडत होते. त्यामुळे अविनाश यांना संसार चालवण्यासाठी हातभार लावावा या भावनेने अनामिका यांनी पती अविनाश यांना रिक्षा चालवण्याची ईच्छा व्यक्त केली. सुवातीला परिवारातील लोकांनी याबाबत कुणकुण सुरु केली. मात्र, पती अविनाश ने अनामिका यांना साथ देत रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देण सुरु केले आणि त्यामुळेच अनामिका या ठाण्यातील पहिल्यांदा महिला रिक्षा चालक बनल्या.