ठाणे - चोरट्यांनी एकाच रात्री कोनगावातील डझनभर दुकाने ( thieves burgle up to dozens of shops ) शटर उचकावून गल्ल्यातील रोकड व काही महागडे साहित्य लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोर सीसीटीव्हीत कैद ( CCTV catches Thief in Thane ) झाले आहेत.
लॉकडाऊननंतर भिवंडीत गुन्हेगारी, घरफोड्यासह चोरीच्या घटनात वाढ
भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी, घरफोड्या, चोऱ्यांच्या घटनात कमालीची वाढ झाल्याचे पोलीस ठाण्यात केलेल्या नोंदीवरून दिसून येते. त्यातच भिवंडी पोलीस परिमंडळ दोनच्या हद्दीतील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण-भिवंडी मार्गावरील कोन नाक्यावर व गावातील दुकानांना चोरट्यांनी ( burgle dozens of shops in Thane ) लक्ष्य केले. सोमवारी एकाच रात्री डझनभर दुकानांचे शटर उचकटून आत प्रवेश करीत दुकानांतील गल्ल्यात असलेली रोकड आणि काही महागडे साहित्य लंपास केले. यामध्ये ५ मेडिकल २ स्वीट मार्ट (मिठाईची दुकाने ) आणि २ इतर दुकानांचा समावेश आहे.
हेही वाचा-Murder in Dharavi : उपचाराला पैसे नसल्याच्या वादातून सुनेने केली सासूची हत्या
तीन दुकानांचे शटर उचकट असताना आवाज झाल्याने चोरट्यांनी पळ काढला होता. मात्र, रात्रपाळीची असलेली पोलीस गस्त दिसून आली नसल्याचे नागरिकाने सांगितले. चोरी झाल्यानंतर अर्ध्यातासाने पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.