ठाणे -दुकानासमोर रस्त्यावर उभ्या केलेल्या एका दुचाकीचे लॉक तोडून चोरट्यांनी ती दुचाकी पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे दुचाकी पळविल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प तीन 17 सेक्शन परिसरात एक्ससाईड बॅटरी शॉपच्या समोर घडली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
चोरट्यांनी लॉक तोडून दुचाकी पळवली; घटना सीसीटीव्हीत कैद
ठाण्यात दुकानासमोर रस्त्यावर उभ्या केलेल्या एका दुचाकीचे लॉक तोडून चोरट्यांनी पळवल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे.
चोरट्यांनी लॉक तोडून दुचाकी पळवली
उल्हासनगर कॅम्प तीन 17 सेक्शन परिसरात एक्ससाईड बॅटरी शॉप या दुकानाचे मालक लखन वाधवा यांची दुचाकी शॉप समोर उभी होती. रात्रीच्या सुमारास एका चोरट्याने मोठ्या शिताफीने दुचाकीचे लॉक तोडून पळवून नेली. मात्र, चोरट्यांकडून ती दुचाकी बंद पडल्याने चोरट्यांनी दुसऱ्या दुचाकीला पायाचे धक्का मारत दुचाकी पळवली. या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या चोरट्यांचा शोध घेत आहे.