ठाणे - भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी कृत्य होत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तीन मोठ्या गुन्ह्यांची उकल केली. आणि त्यात दहा किलो गांजा ,एक रिव्हॉल्व्हर दोन जिवंत काडतुसांसह चोरीस गेलेला 80 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश मिळवले आहे.
सोन्याच्या दागिन्यांची चोरी शानदार मार्केटमध्ये गांजा कनेक्शनपोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत आमपाडा शानदार मार्केट येथे सोहेल शेख नामक व्यक्ती आपल्या साथीदारासह गांजा विक्री करण्यासाठी येणार होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शानदार मार्केट येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या मोटारसायकलवरील पिशवीतील दोन पॅकेटमध्ये 2 लाख 7 हजार 800 रुपये किमतीचा 10 किलो 390 ग्रॅम गांजा व दुचाकी मोबाईल असा एकूण 2 लाख 57 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी पळाला होता झारखंडलाभिवंडीतील टेमघर परिसरात गोरखनाथ अंकुश म्हात्रे यांनी सार्वजनिक रस्त्यालगत आपल्या जवळील 90 ग्रॅम वजनाचे दागिने आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवून दुचाकी उभी करून ठेवली होती. त्यावेळी आरोपी अनिल पाल याने सदर दुचाकी चोरी केली होती. याबाबत 2 लाख 15 हजार रुपयाच्या डिक्कीतील दागिनेसह दुचाकी चोरीची तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी तांत्रिक तपासा द्वारे माहिती मिळविली. त्यांनतर आरोपीच्या शोधात पोलीस पथक झारखंड राज्यातील रांची शहरात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून 80 ग्रॅम सोन्याचे दागिनेही हस्तगत केले आहेत.
लुटीचा डाव उधळलाशांतीनगर भाजी मार्केट येथील मन्नत गोल्ड या सोने विक्रीच्या दुकानात काल रात्री साडेनऊ वाजताच्या चांदीची अंगठी खरेदी करण्याचा बहाण्याने आलेल्या ग्राहकाने दुकानदार अंगठी दाखवीत असताना आपल्या जवळील रिव्हॉल्व्हर दुकानदाराच्या गळ्याला लावून त्याकडील सर्व दागिने चोरीचा प्रयत्न केला. मात्र या गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच गांभीर्य लक्षात घेऊन पो शिपाई श्रीकांत पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला फिल्मी स्टाईलने निशस्त्र करून त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्याच्या जवळून एक रिव्हॉल्व्हर दोन जिवंत काडतुसं जप्त करण्यात यश मिळविले आहे.अशी माहिती भिवंडीचे पोलीस उपयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.