भोपाळ- धावत्या रेल्वेमध्ये उतरण्यासाठी दरवाजात उभ्या असलेल्या महिलेच्या हातातील बॅग खेचून चोर पसार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना भोपाळ येथे २ जानेवरीला इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये घडली. महिलेची बॅग खेचणाऱ्या या चोरट्याचे नाव दानिश आहे.
चालत्या रेल्वेमध्ये थरार; दरवाजात उभ्या असलेल्या महिलेची बॅग घेऊन चोरटा फरार - thane
दोन जानेवारीच्या रात्री रेल्वेमधून उतरण्यासाठी एक महिला दरवाज्यात उभी होती. दरम्यान, एक चोरटा अचानक धावत्या रेल्वेमध्ये चढला आणि महिलेच्या हातातील बॅग खेचून पसार झाला. धावत्या रेल्वेमध्ये अचानक झालेल्या या प्रकाराने महिलेचा तोल गेला. मात्र, सुदैवाने महिला रेल्वेमधून बाहेर पडण्यापासून वाचली.
रेल्वेमधून उतरण्यासाठी एक महिला दरवाज्यात उभी होती. त्यादरम्यान, एक चोरटा अचानक धावत्या रेल्वेमध्ये चढला व काही कळायच्या आतच त्याने महिलेच्या हातातील बॅग खेचली आणि पसार झाला. धावत्या रेल्वेमध्ये अचानक झालेल्या या प्रकाराने महिलेचा तोल गेला. मात्र, सुदैवाने महिला रेल्वेमधून बाहेर पडण्यापासून वाचली. सहप्रवाशांनी महिलेला पकडल्याने तिचे प्राण वाचले. हा संपूर्ण थरार ट्रेनच्या दरवाजात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये पण सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले आहे.
हेही वाचा-पिळदार शरीराची हाव पडली महागात; कृत्रिम आहारामुळे कुर्ल्यातील युवकाच्या दोन्ही किडन्या निकामी