महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Thane Murder : महिलेचा खून करून मृतदेह ब्लॅकेटमध्ये गुंडाळून गटारात फेकला; परिसरात खळबळ ... - स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय

भिवंडी तालुक्यातील (Thane Murder) गोदाम पट्टा समजल्या जाणाऱ्या वळपाडा हद्दीतील, पारसनाथ कंपाऊंड येथे एका मोठ्या गटारात (the body thrown into the sewer) ब्लॅकेटमध्ये गुंडाळूलेल्या (the body was wrapped in a blanket) अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला. मृत महीलेचे (woman was killed) वय 30 ते 35 वर्षे असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नारपोली पोलीसांनी, अज्ञात आरोपीविरोधात भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करून, तपास सुरु केला. तर, महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात (Late Indira Gandhi Upazila Hospital) रवाना केला.

Thane Murder
ठाणे खून

By

Published : Jul 27, 2022, 6:26 PM IST

ठाणे :(Thane Murder) एका ३० ते ३५ वर्षीय अनोळख्या महिलेचा मृतदेह (woman was killed) ब्लॅकेटमध्ये (the body was wrapped in a blanket) गुंडाळूलेल्या अवस्थेत गटारात (the body thrown into the sewer) आढळून आल्याने, परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील वळपाडा हद्दीतील, पारसनाथ कंपाऊंड मधील एका मोठ्या गटारात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात, हत्येसह पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात दाखल करून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे.



भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्टा समजल्या जाणाऱ्या वळपाडा हद्दीतील, पारसनाथ कंपाऊंड मधील दोन इमारतीच्या गोदामामध्ये मोठे गटार आहे. या गटारीच्या बाजूला काल (26 जुलै) रात्रीच्या सुमारास गावातील एका प्लंबरला महिलेचा मृतदेह ब्लॅकेटमध्ये गुंडाळूलेल्या अवस्थेत दिसला होता. त्याने या घटनेची माहिती वळपाडा हद्दीतील सुनंदा पाटील (वय ४८) यांना दिली. माहिती मिळताच, पोलीस पाटील यांनी नारपोली पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत, महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. तर आज (27 जुलै) पहाटेच्या सुमारास पोलीस पाटील, यांच्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात, अज्ञात आरोपीविरोधात भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला. या गुन्हाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (प्रशासन) राजेश वाघमारे करीत आहेत.

हेही वाचा :Beed Crime : धक्कादायक! दुसरी मुलगी नको म्हणून परळीत अक्षरशः कापून काढला गर्भ

ABOUT THE AUTHOR

...view details