महाराष्ट्र

maharashtra

खिडकीचे गज कापून डोंबिवलीतील मिलापनगरमध्ये चोरून नेली चक्क तिजोरी

By

Published : Apr 1, 2021, 4:57 PM IST

Updated : Apr 1, 2021, 5:06 PM IST

31 मार्च रोजी पहाटे तीनच्या सुमारास चोरट्याने त्यांचा बंगल्याच्या किचन खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला आणि छोटी तिजोरी उचलून घेऊन गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

तिजोरी चोरी
तिजोरी चोरी

ठाणे -डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील मिलापनगरमध्ये असलेल्या प्लॉट क्र. RL 69 इंद्रप्रस्थ या बंगल्यातील अनिल मेहता हे त्यांच्या पत्नीसह त्यांच्या अमेरिकेतील मुलाकडे राहण्यास गेले आहेत. 31 मार्च रोजी पहाटे तीनच्या सुमारास चोरट्याने त्यांचा बंगल्याच्या किचन खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला आणि छोटी तिजोरी उचलून घेऊन गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

रहिवाश्यांची भीतीने गाळण

विशेष म्हणजे चोरट्याने जाताना सीसीटीव्हीमध्ये आपली छबी कैद होऊ नये, यासाठी तो घरातील सीसीटीव्हीची मशीन (DVR)सोबत घेऊन गेला. मात्र सुदैवाने शेजारी राहणारे विनोद ठाकूर यांच्या बंगल्यातील सीसीटीव्हीमध्ये तो कैद झाला आहे. बंगल्यात चोरी झाल्याच्या वृत्ताने आसपासच्या परिसरातील रहिवाश्यांची भीतीने गाळण उडाली आहे. या संदर्भात इंद्रप्रस्थ या बंगल्याचे मालक अनिल मेहता यांचा भाचा निलेश जितेंद्र साव (43) यांच्या जबाबावरून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लाखोंचे दागिनेसह रोकडही तिजोरी लंपास

चोरट्याने उचलून नेलेल्या तिजोरीमध्ये 25 हजार रूपये किंमतीची एक 25-20 ग्रॅम वजनाची कानातील रिंग, अंगठ्या, 2 हजार रूपये किंमतीचा 50 ग्रॅम वजनाचा चांदीचा तामण दिवा, 25 हजार रूपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस, 20 हजार रूपये किंमतीच्या दोन 20 ग्रॅम वजनाच्या सोन्याची बांगड्या, असे 65 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 20 हजार रूपये रोख रक्कम, 3 हजारांचा बंगल्यातील सीसीटीव्ही कमेऱ्याचा डिव्हीआर, अनिल मेहता, नेहा मेहता, मिताली मेहता आणि हश मेहता यांचे जुने पासपोर्ट, महत्त्वाचे कागदपत्रे, बँक लॉकर्सच्या चाव्या, बीएमडब्ल्यू कारच्या चाव्या, आदी मौल्यवान मुद्देमाल होता. मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्यानंतर तपास सुरू केला आहे.

चोऱ्या-घरफोड्यांचे प्रमाण वाढले

विशेष म्हणजे पोलिसांच्या सूचनेनुसार सदर बंगल्याचा परिसरातील लेनमधील सर्व रहिवाश्यांनी रात्रीसाठी एका रखवालदाराची नेमणूक केली होती. मिलापनगरमध्ये काही दिवसांपासून चोऱ्या-घरफोड्यांचे प्रमाण वाढले असल्याचे स्थानिक रहिवासी तथा डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी सांगितले.

Last Updated : Apr 1, 2021, 5:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details