ठाणे - काल रात्री ठाणे महानगर पालिकेने ठाण्यातील 16 ठिकाणी लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र आज राज्य सरकारने आवश्यकता नसताना लॉकडाऊन जाहीर केल्याने चांगलीच कानउघाडणी केली आहे .त्यामुळे आता हे आदेश मागे घेत नवीन नियम असलेले आदेश काढण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर आली आहे.
ठाणे महानगर पालिकेची राज्य सरकार कडून कानउघाडणी; लॉकडाऊनचा निर्णय घेतला मागे - thane corona news
काल रात्री ठाणे महानगर पालिकेने ठाण्यातील 16 ठिकाणी लॉकडाऊन जाहीर केला होता.
पालिका प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी-
एकीकडे पुन्हा लॉकडाऊन होईल या भीतीने नागरिक त्रस्त आहेत. त्यात त्यांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी केली
आहे. अशावेळी पालिका प्रशासनाने संभ्रम निर्माण होईल, असे आदेश काढले होते. आता राज्य सरकार आणि मुख्य सचिवांनी पालिका प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली त्यामुळे आता पालिका प्रशासनावर आधीचे आदेश मागे घेत नवीन नियमावली काढण्याची वेळ आली आहे.
हॉटस्पॉटमध्ये देखील आता लॉकडाऊन नसून जे नियम मिशन बिगेन अंतर्गत सगळीकडे आहेत. तेच नियम आता ठाण्यातही लागू असणार आहेत. काल काढलेल्या आदेशांमध्ये हॉटस्पॉट परिसरात लॉकडाऊन असल्याचे म्हटले होते. मात्र एका रात्रीत ठाणे महानगरपालिकेने नवीन आदेश काढले. कोलांटउड्या मारत हॉटस्पॉटमध्ये सर्व सुविधा सुरू असतील, असं सांगत पालिका प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष देऊन राहणार असल्याचे सांगितले आहे.
माध्यमांनी घोळ केला-
पालिका प्रशासनाला काल आदेश काढल्या पासून ठाण्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र हा गोंधळ मीडियामुळे झाला असे पालिका प्रशासन सांगत आहे. आता नवीन नियमावली करणार असल्याचे सांगितले आहे