BMC Pipeline burst : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाण्याच्या नासाडी - बीएमसी न्यूज
वैतरणा धरणातून (Vaitrana Dam) आलेली पाईपलाईन ही 96 इंचाची असून या पाइपलाईनच्या वरच्या बाजूने असलेले कनेक्शन टाकण्यासाठी विविध ठिकाणी बूच बसवण्यात आलेले आहेत. मात्र त्यापैकी एक बूच आज दुपारच्या सुमारास अचानक फुटल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला व पाण्याची कारंजी वरपर्यंत उडत होती.
BMC Pipeline burst
ठाणे : भिवंडी तालुक्यातील वळगाव ग्रामपंचायत हद्दीमधील मुंबई महानगरपालिकेची(Mumbai Muncipal Corporation) वैतरणा पाईपलाईनचे (Vaitrna Pipeline) कनेक्शन बूच निघाल्याने 50 ते 60 फूटांपर्यंत पाण्याची कारंजी उडत असून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. यामुळे पाइपलाईनच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला होणाऱ्या कोटयवधी खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.