ठाणे - प्रेमविवाह केल्यानंतर पत्नीला खुश ठेवण्यासाठी पैसे कमावायचे म्हणून पतीने चक्क दुचाकी चोरण्याचा मार्ग निवडला. दरम्यान, या इसाचा हा व्यवहार (Two-Wheeler Theft In Thane ) उघड झाल्यानंतर मानपाडा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून आतापर्यत १९ दुचाकी जप्त केल्या आहेत. तर भंगारात विकलेल्या २३ दुचाकींचे काही पार्ट मिळून अशा सुमारे ४८ दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. यासासोबत त्याच्या 5 साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (The Husband Earning Money by Stealing a Bike) दीपक सलगरे (रा. पालेगाव अंबरनाथ ) असे यातील म्होरख्याचे नाव आहे. तर राहुल डावरे, चौहान उर्फ बबलू , धर्मदेव चौहान, समशेर खान , भैरवसिंग खरवड अशी त्याब्यात घेतलेल्यांची नावं आहेत.
चोरीच्या दुचाकी विक्री, काही भंगारात
दिपकने एका तरुणीशी नुकताच प्रेमविवाह केला होता. मात्र, तिला दुचाकीवरून फिरण्याचा छंद असून तिला मौजमजा करण्याची इच्छा पतीकडे बोलून दाखवली. (Two-Wheeler Theft In Manpada) त्यानंतर त्याने दुचाक्या लंपास करण्याचे ठरवून त्याने सहा जणांची टोळी तयार केली. त्यावेळी आरोपीने बाजारपेठ, अंबरनाथ , उल्हासनगर, डायघर, भिवंडी मानपाडा, कल्याण अशा विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध परिसरातून दुचाकी लंपास करण्याचा सपाटा लावला होता. लंपास केलेल्या दुचाकी डोंबिवली नजीक पलावा येथे राहणारा त्याचा साथीदार राहुलला विक्री करणे किंवा भंगारवाल्याकडे देऊन त्याचे पार्ट काढून त्यांची कमी दरात विक्री करणे अशापद्धतीचे गुन्हे तो आणि त्याचे साथीदार करीत होते.