महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाण्यात हत्या करून फरार झालेल्या आरोपीला 8 वर्षानंतर अटक - युपी एटीएस

हत्या करून फरारी झालेला आरोपी चक्क आठ वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता.

आरोपीला 8 वर्षानंतर अटक
आरोपीला 8 वर्षानंतर अटक

By

Published : Jan 1, 2021, 8:41 PM IST

ठाणे -हत्या करून फरारी झालेला आरोपी चक्क आठ वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता. या आरोपीचे नाव इनामूल इयाद अली हक आहे. त्याची माहिती खबऱ्याने नेपाळमधून दिली. त्यानुसार ठाणे पोलीस पथकाने खबऱ्याच्या आधारे युपी एटीएस यांच्या मदतीने गोरखपूर जिल्ह्यातून फरारी आरोपी इनामूल इयाद अली हक याला बेड्या ठोकल्या. त्याने आपल्याच मित्राची हत्या करून पोबारा केला होता. हत्येमागच्या कारणाचा पोलीस खुलासा करत आहेत.

हत्येनंतर आरोपी इनामूल इयाद अली हक फरारी झाला होता-

मृतक कदम्बूल उर्फ ताजामुल उर्फ ताजात्यूल हक दुख्खु शेख (२२) आणि आरोपी इनामूल इयाद अली हक, हे दोघेही ठाण्याच्या कोपरी परिसरात राहत होते. इनामूलने ताजामुलची १० सप्टेंबर २०१२ रोजी रात्री साडेदहा वाजता धारदार सुऱ्याने गळा चिरून हत्या केली होती. या प्रकरणी कोपरी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला. पोलीस तपासात मृतकाच्या सोबत आरोपी इनामूल इयाद अली हक राहत होता. दोघेही पश्चिम बंगालच्या मांदला जिल्ह्यातील माणिकचौक तालुक्यातील असिनटोला गावाचे निवासी आहेत. मात्र हत्येनंतर आरोपी इनामूल इयाद अली हक फरारी झाला होता.

अनेक वर्ष पोलिसांना देत होता गुंगारा-

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीच्या मूळगावी गेले होते. मात्र आरोपी हा विविध राज्यात जाऊन आपले अस्तित्व लपवून राहत होता. मागील दोन वर्षांपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाला नेपाळच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आरोपी इनामूल इयाद अली हक हा गोरखपूर युपी येथे राहत असल्याचे समोर आले. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या चार टीम गोरखपूर मध्ये पोहचल्या. त्यांनी युपी एटीएसच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन अखेर गोरखपूर रेल्वे स्टेशनवर सापळा रचून आरोपीला अटक केली. अटकेनंतर आरोपीला गोरखपूर न्यायालयात नेले. आरोपीला न्यायालयाने ट्रांझीस्ट रिमांडवर ठाण्यात पाठविले. पोलिसांनी आरोपीला ठाण्यात आणून अधिक चौकशी सुरु केली आहे.

हेही वाचा-Breaking News : सीरमच्या कोरोना लसीला सशर्त मान्यता

ABOUT THE AUTHOR

...view details