ठाणे : धक्कादायक!!! आठव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा जागीच मृत्यू - bhiwandi
भिवंडी तालुक्यातील बोरपाडा परिसरात मुंबईतील सुप्रसिद्ध बिल्डर अनुप करनानी यांच्या वतीने उच्चभ्रू अंबिका सिटी नावाने गृह संकुल उभारणीचे काम सुरु आहे. या अंबिका सिटीत घर घेणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिल्म अभिनेता संजय कपूर यांची उपस्थिती देखील पहायला मिळाली होती.
ठाणे - एका इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन साईड अभियंता खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील बोरपाडा परिसरात अंबिका सिटी येथे घडली आहे. मात्र त्या ठिकाणी बांधकाम विकासकाकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या नसल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मोहम्मद आमीन मोहम्मद मुस्तकीम अन्सारी (वय 27 वर्ष) असे मृत अभियंताचे नाव आहे.