ठाणे - डॉक्टरवर पार्किंगच्या वादातून शेजारी राहणाऱ्याने धारदार कोयत्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवार (दि. 14 फेफ्रुवारी)रोजी मुरबाड शहरातील अंजली गॅस परिसरात असलेल्या रस्त्यावर घडली आहे. या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. (Assault on a Doctor In Thane ) भाऊ मुरबाडे असे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. तर, डॉ. धीरज श्रीवास्तव असे जखमी डॉक्टारांचे नाव आहे.
हल्लेखोराला आज न्यायालयात हजर करणार
मुरबाड शहरातील अंजली गॅस परिसरात डॉ. धीरज श्रीवास्तव यांचे क्लिनिक आहे. नेहमी प्रमाणे सोमवारी दुपारी साडेअकरा वाजता त्यांनी क्लिनिकबाहेर आपली दुचाकी पार्क केली होती. मात्र, या ठिकाणी दुचाकी पार्क करू नये असे सांगत भाऊ मुरबाडे याने डॉ. धीरज यांच्या सोबत वाद घातला.