ठाणे -राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर कमी ( Petrol diesel prices lower ) झाले तरी, गृहिणींना मात्र दिलासा मिळालेला नाही. दैनंदिन जीवनातील मूलभूत गरज असलेल्या अन्न धान्यावर केंद्र सरकारने ५ टक्के जीएसटी ( 5% GST on food grains ) लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुढील काही दिवसात तो लागू होण्याची शक्याता आहे. यामध्ये अन्नधान्यावर प्रती किलो ५ ते ८ रुपये वाढणार आहेत. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजट कोलमडणार आहे. यावर सरकारने पुनर्विचार करावा असे, आवाहन गृहिणी करत आहेत.
GST On Food Grains : गृहिणींचे बजेट कोलमडणार; अन्नधान्यावर पाच टक्के जीएसटी
केंद्र सरकारने ( Central Govt ) अन्न-धान्यावर ५ टक्के जीएसटी ( 5% GST on food grains ) लावण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न-धान्यावर जीएसटी लावल्याने महागाईत आणखी भर ( Rising inflation ) पडणार आहे. यामध्ये अन्नधान्यावर प्रती किलो ५ ते ८ रुपये वाढणार आहेत. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजट कोलमडणार आहे.
गृहिणींना खर्चावर अधिक भर -जीएसटी लागू झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंवर कर न लावण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, आता हाच कर जीवनावश्यक वस्तूंवर लावण्याचा निर्णय घेतल्याने गृहिणींना खर्चावर अधिक भर येणार आहे. गॅस सिलेंडर, शाळांची फीस, या सगळ्या खर्चात आता अन्नधान्य महाग ( ( Rising inflation ) ) होणार आहे. त्यामुळे घर कसे चालवणार असा प्रश्न गृहिनिंसमोर उपस्थित होत आहे. जीएसटी वाढवण्याच्या निर्णयावर व्यापारी वर्ग नाराज आहे . जीवनावश्यक वस्तूंचे कोणताही कर न लावण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला होता. आता हा कर लावण्यात येत असल्याने तो निर्णय चुकीचा आहे. शनिवारी व्यापारी कर वाढ विरोधात भारत बंदच्या भूमिकेत असणार आहेत असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे .आता गृहिणी व्यापाऱ्यांच्या या सर्व अडचणींवर कशा प्रकारे सरकार कोणता निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.