महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भिवंडीत इमारत कोसळली; एकाचा मृत्यू तर 9 जखमी

भिवंडी महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा इमारत कोसळण्याची घटना घडली असून या घटनेत एका रहिवासाचा मृत्यू झाला आहे. तर नऊ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी स्वर्गीय इंद्रागांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

By

Published : Sep 3, 2021, 1:25 PM IST

ठाणे - भिवंडी महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा इमारत कोसळण्याची घटना घडली असून या घटनेत एका रहिवासाचा मृत्यू झाला आहे. तर नऊ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी स्वर्गीय इंद्रागांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भिवंडीत इमारत कोसळली; एकाचा मृत्यू तर 9 जखमी

भिवंडी महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक चार क्षेत्रातील आजमी नगर झोपडपट्टीतील दहा बाय दहाच्या लोड बेरिंगवर तळ अधिक एक मजली घर कोसळून आज सकाळी एक जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी झाले असून जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे तर दुसरीकडे महापालिका अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल असून कोसळलेला मलबा हटवण्याचे काम व मदत कार्य सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details