महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक! लोभापोटी पोटचा पोरगा झाला वैरी, स्क्रू ड्राइव्हर भोकसून केला आईचा खून

स्क्रू ड्राइव्हरने भोकसून आपल्याच जन्मदात्या आईचा खून केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी मुंब्रा रेतीबंदर परिसरात घडली. या घटनेने मुंब्रा आणि रेतीबंदर परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून खुनी पोरगा विशाल अलझेन्डे याला अटक केली आहे.

मुलाकडून आईचा खून
मुलाकडून आईचा खून

By

Published : Jul 21, 2021, 9:20 PM IST

ठाणे -विवाह नाही, कुटुंब नाही, कमविलेला पैसा उडवायचा आणि आपल्या आईकडे पैशाची वारंवार मागणी करायचा. पण पोटच्या मुलाच्या वारंवार पैसे मागण्याच्या तगाद्याला कंटाळलेल्या आईने नकार दिला. पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात पोटचा मुलगाच आईच्या जीवनाचा वैरी झाला. स्क्रू ड्राइव्हरने भोकसून आपल्याच जन्मदात्या आईचा खून केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी मुंब्रा रेतीबंदर परिसरात घडली. या घटनेने मुंब्रा आणि रेतीबंदर परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून खुनी पोरगा विशाल अलझेन्डे याला अटक केली आहे.

लोभापोटी पोटचा पोरगा झाला वैरी, स्क्रू ड्राइव्हर भोकसून केला आईचा खून

स्क्रू ड्राइव्हर भोकसून केला आईचा खून

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेतीबंदर परिसरार अलझेन्डे परिवार राहत होता. या परिवारात आरोपी विशाल अलझेन्डे हा कामधंदा करीत होता. मात्र कमविलेले सर्व पैसे उडवीत होता. तरीही हौस पुरी न झाल्याने तो आपली आई उर्मिला हिच्याकडे कायम पैसे मागायचा उर्मिलाही त्याला नेहमी पैसे द्यायची. विशाल हा अविवाहित होता. त्यामुळे आई त्याला पैसे सांभाळ, चांगला राहा, पैसा उडवीत जाऊ नको असे प्रबोधन नेहमीच करायची. मात्र विशाल नेहमीच एका कानाने एकूण दुसऱ्या कानाने सोडून देत होता. मात्र, सोमवारी दुपारी पोटचा मुलगाच जन्मदात्या आईचा वैरी ठरला. विशालने आईकडे पैसे मागितले. आई उर्मिलाने त्याला पैसे देण्यास नकार दिला. तरीही वारंवार पैशाची मागणी सुरूच होती. आणि उर्मिला नकार देत होती. अखेर विशाल मधला सैतान जागा झाला. नेहमी पैसे देणारी आई आपल्याला आज पैसे देत नाही. याचा राग विशालला अनावर झाला. त्याने जवळच पडलेल्या स्क्रू ड्राइव्हरने आपल्याच आईच्या छातीत खुपसला. हा घाव इतका जबरदस्त होता की, उर्मिला ही जागीच गतप्राण झाली.

आरोपी मुलला बेड्या

आसपासच्या नागरिकांनी या घटनेनंतर मुंद्रा पोलीस ठाण्याला कळविले. मुंब्रा पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी मृत उर्मिला अलझेन्डे हीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. तर खून करणाऱ्या विशाल अलझेन्डे याला अटक करून मुंब्रा पोलीस ठाण्यात आईच्या हत्येबाबत खुनाचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा -ब्लास्ट करून ATM मशीनची चोरी, सीसीटीव्हीला सॅल्यूट करत चोरटे फरार

हेही वाचा -...या बे, VIDEO पाहा बे पोट्टेहो! मास्तरांच्या खास शैलीतून स्पर्धा परीक्षा, गर्लफ्रेन्ड अन् बरंच काही...

ABOUT THE AUTHOR

...view details