ठाणे - अंगणवाड्यांचा कारभार डिजिटल झाला असला तरी अंगणवाडी सेविकांना पुरवण्यात आलेले मोबाईल या निकृष्ट ठरल्याचे समोर आले आहे . कोरोनाकाळात अंगणवाडीसह गर्भवती मातांचा व बालकांसंदर्भातील दैनंदिन कामकाजाचा अहवाल ऑनलाइन भरण्यासाठी सेविकांना दिलेले स्मार्टफोन निकृष्ठ दर्जाचे असल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले आहे. तसेच पोषण ट्रॅकर ॲप मराठी भाषेत असावे, अशीही मागणी अंगणवाडी सेविकांनी सरकारला केली आहे.
ठाण्यात निकृष्ट दर्जाच्या मोबाईलमुळे अंगणवाडी सेविका त्रस्त - anganwadi worker
हे मोबाईल हे निकृष्ट दर्जाचे असून त्याचे सर्विस सेंटर देखील उपलब्ध नाही. त्यामुळेच हा मोबाईल जर दुरुस्त करावा लागल्यास बाहेर दुरुस्ती करावी लागते. या दुरुस्तीचा खर्च देखील शासनाकडून दिला जात नाही.
राज्य शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना व महिला व बालविकास विभागामार्फत ठाणे जिल्हयात सुमारे १५९६ अंगणवाडी केंद्रे व तब्बल २५८ मिनी अंगणवाड्या आहेत. येथे कार्यरत अंगणवाडी सेविकांचे काम सुरळीत व्हावे आणि सर्व माहिती त्वरित संकलित व्हावी या उद्देशाने अडीच वर्षांपूर्वी राज्यातील अंगणवाडी सेविकांना सरकारतर्फे स्मार्टफोन देण्यात आले. परंतु, हे मोबाईल आता त्यांच्या डोकेदुखीचे कारण बनले आहेत. हे मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्याची बॅटरी फार काळ टिकत नसल्याने सतत बंद पडतात. त्यातच मोबाईलमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने त्याच्या दुरुस्तीचा खर्चदेखील या सेविकांनाच करावा लागतो. आपले वेतन अत्यंत अल्प असून हा खर्च आम्हाला परवडत नसल्याची खंत अनेक सेविकांनी व्यक्त केली. तसेच डाउनलोड करून दिलेला पोषण ट्रॅकर ॲप इंग्रजी भाषेत असल्याने बहुतांशी अंगणवाडी सेविकांना त्यात माहिती भरणे अवघड जात आहे. यामुळे अनेकदा चुकीची माहिती भरली गेल्याने या अंगणवाडी सेविकांना त्रास होत असल्याचे मत अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केले.
मोबाईल दुरुस्ती खर्च स्वतःचा
हे मोबाईल हे निकृष्ट दर्जाचे असून त्याचे सर्विस सेंटर देखील उपलब्ध नाही. त्यामुळेच हा मोबाईल जर दुरुस्त करावा लागल्यास बाहेर दुरुस्ती करावी लागते. या दुरुस्तीचा खर्च देखील शासनाकडून दिला जात नाही. त्याचा भुर्दंड अंगणवाडी सेविकांना करावा लागतो आहे. आधीच मानधन कमी असल्यामुळे अंगणवाडीसेविका हवालदिल आहेत. आणि त्यात या मोबाईलचा खर्च अंगणवाडी सेविकांना परवडणार नाही.
हेही वाचा -या' कारणामुळे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात दाखल...