ठाणे - ठाणे व मुंबई यांमध्ये असलेल्या टोल नाक्यावर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यासाठी केलेल्या नाकाबंदीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
कार्यकर्त्यांच्या धरपकडीसाठी नाकाबंदी; टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा - thane traffic jam news
ठाणे व मुंबई यांमध्ये असलेल्या टोल नाक्यावर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यासाठी केलेल्या नाकाबंदीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
टोल नाक्यावर लांबच लांब रांगा
मुंबईच्या हद्दीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येऊ नये, यासाठी ही नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी प्रत्येक गाडीची तपासणी करण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यापासून पूर्व द्रुतगती महामार्गावर घोडबंदर रस्त्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.यामुळे रुग्णवाहिकांचीही अडचण झाली आहे. पोलिसांच्या या नाकाबंदीचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसल्याचे चित्र आहे.
Last Updated : Sep 27, 2019, 7:23 PM IST