ठाणे -जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुबलक नैसर्गिक साधनसंपत्ती असून, पावसाळ्यात विविध ओढ, धबधबे जिवंत होत असतात. पर्यटन विभाग व जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात 29 पर्यटक स्थळ जाहीर केली आहे. मात्र, यापैकी जिल्हा प्रशासनाने धबधाब्यासह निसर्ग पर्यटन केंद्रांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. या पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. ( Thane Tourism Dangerous ) या पर्यटनामुळे ठाणे जिल्ह्यात एक वेगळी स्थानिकांची अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. मात्र, या नैसर्गिक पर्यटन स्थळांवर अपघात घडून दुर्घटना घटनांनंतर खबरदारीचे उपाय योजन्या ऐवजी जिल्हा प्रशासनाकडून या निसर्ग पर्यटन केंद्रांवर फिरण्यास थेट बंदी घातली आहे. या बंदीची गेल्या 4 वर्षांपासून परंपरा सुरू आहे. यामुळे मात्र पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होते आहे.
अतिउत्साही पर्यटकांमुळे अनेक अपघात - मागील 4 वर्षांपासून अशाच पद्धतीने जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात येत आहे. या वर्षीही या पर्यटन स्थळांवर जाण्यास मिळणार नसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. ठाणे जिल्ह्यासह पुणे, नाशिक, मुंबई, उपनगर आणि आसपासच्या जिल्ह्यांतून पर्यटक येत असतात. ( Thane Tourism Dangerous ) त्यामुळे अनेकदा अतिउत्साही पर्यटकांमुळे आतापर्यत अनेक बळी जाऊन जीवितहानी घडल्याने जिल्हा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मुरबाड, शहापूर तालुक्यात या क्षेत्रात जाण्यास मनाई -मुरबाड तालुक्यातील सिध्दगड, डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, हरिश्चंद्रगड, बारवीधरण परिसर, पडाळे डॅम, माळशेत घाटातील सर्व धबधबे, पळू, खोपवली, गोरखगड, सिंगापुर नानेघाट, धसई डॅम, आंबेटेवे मुरबाड ही स्थळे आहेत. तर शहापूर तालुक्यातील भातसा धरण स्थळ, कुंडन दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा, चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत ( डोळखांब ) सापगांव नदीकिनारी कळंवे नदी किनारा, कसारा येथील सर्व धबधबे या स्थळांवर जाण्यास मनाई हुकूम जारी करण्यात आले आहे.