महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

युक्रेनमध्ये प्रवेश घेतानाच ठाण्यामधील विद्यार्थ्याने सुटकेची केली होती तयारी; 80 तास रांगेत थांबून परतला मायदेशी - लव शर्मा विद्यार्थी मुलाखत

तीन वर्षापूर्वी वैद्यकीय प्रवेश घेताना लव्ह शर्माच्या वडिलांनी भविष्याचा विचार ( Admission near Ukraine border ) केला होता. त्यावेळेसदेखील युक्रेन आणि रशियामधील परिस्थिती ही गंभीरच होती. भविष्यात युद्ध झाले तर युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी त्याने सीमेजवळ असलेल्या वैद्यकीय विद्यापीठात ( Indian student in Ukraine university ) प्रवेश घेतला होता.

लव शर्मा व कुटुंबीय
लव शर्मा व कुटुंबीय

By

Published : Mar 5, 2022, 3:35 PM IST

Updated : Mar 5, 2022, 4:46 PM IST

ठाणे - रशिया युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या ( Russia Ukraine crisis ) युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर पाहायला मिळत आहे. भारतातून युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत ( Indians students in Ukraine ) आहेत. भारत सरकार या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणत आहे. ठाण्यातील लव शर्मा हा विद्यार्थी शनिवारी सकाळी ( Student Love Sharma interview ) आपल्या मायदेशी परतला आहे.

युक्रेन येथे सुरू असलेल्या युद्धाचे थरकाप उडवणारे व्हिडिओ हे आपण पाहिलेच आहेत. परंतु तेथील परिस्थिती अधिकच भयावह आहे. भारतात परतण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागत आहेत. हजारो विद्यार्थी हे मायदेशी परतले आहेत. परंतु त्यांच्या बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी आहे. जवळपास चार ते पाच दिवस या विद्यार्थ्यांना आपल्या मायदेशी परत येण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.

80 तास रांगेत थांबून परतला मायदेशी

हेही वाचा-Ukraine Russia War : युक्रेनमधून परतणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारतात इंटर्नशिप करता येणार, पण 'ही' आहे शर्त

युद्धजन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे हाल-

कडाक्याची पडलेली थंडी, राहायला नसलेले साधन व खाण्यासाठी अपुरे जेवण यामुळे विद्यार्थ्यांचे अधिकच हाल होत आहेत. लव शर्मा याला रोमानियन सरकारकडून मदत मिळाली. लवसारख्या शेकडो विद्यार्थ्यांना रुमानिया सरकारने केलेल्या मदतीमुळेच घरी येता आले आहे. केंद्र सरकार आणि रोमानिया सरकार यांनी दोघांनी मिळून प्रयत्न केले. त्यामुळेच ही मुले आपल्या घरी पुन्हा येऊ शकली आहेत. तर तिथे युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना लवकर मायदेशी परत आणण्यासाठी लव शर्मा यांनीदेखील सरकारकडे विनंती केली आहे.

हेही वाचा-Disha Salian Case : मालवणी पोलिसांसमोर राणे पिता-पुत्र हजर; जवाब नोंदवणार

प्रवेश घेण्यापूर्वी घेतला होता धसका
तीन वर्षापूर्वी वैद्यकीय प्रवेश घेताना लव्ह शर्माच्या वडिलांनी भविष्याचा विचार ( Admission near Ukraine border ) केला होता. त्यावेळेसदेखील युक्रेन आणि रशियामधील परिस्थिती ही गंभीरच होती. भविष्यात युद्ध झाले तर युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी त्याने सीमेजवळ असलेल्या वैद्यकीय विद्यापीठात ( Indian student in Ukraine university ) प्रवेश घेतला होता. त्याचा प्रत्यक्षात आता फायदा झालेला पाहायला मिळत आहे.

हेही वाचा-Russia declares ceasefire in Ukraine : हल्ले थांबणार, रशियाकडून युक्रेनच्या दोन शहरांमध्ये तात्पुरता युद्धविराम

रोमानिया सरकारकडून मदत
युक्रेनवरून बाहेर पडण्यासाठी सर्व विद्यार्थी रोमानिया देशाकडे जात आहेत. भारतीयांना मिळणारी मदत ही सर्वात जास्त महत्त्वाची होती. कारण भारताचे आणि रोमानियाचे असलेले चांगले संबंध आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे स्वेटर नव्हते. खाण्यासाठी अन्नपदार्थ नव्हते. राहायला जागा नव्हती. या सर्व वस्तू तेथील नागरिकांनी आणि तिथल्या चर्चच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

सर्वजण सुखरूप यावेत
सर्व विद्यार्थी सुखरूप यावेत, अशी प्रार्थना करत आहेत. कारण त्यांनी पाहिलेली परिस्थिती गंभीर होती. बर्फाळ प्रदेशात जीव वाचवण्यासाठी सर्वांनी केलेले प्रयत्न लवने पाहिले आहेत. सर्व विद्यार्थी सुखरूप यावेत आणि सरकारने तात्काळ त्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी लव शर्मा यांनी केली आहे.

Last Updated : Mar 5, 2022, 4:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details