महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Thane Corporator Video : निवडणुकांपूर्वी शिवसेनेतील अंतर्गत कलह उघड; ठाण्यात भिडले नगरसेवक - ठाणे शिवसेना नगरसेवक व्हिडीओ व्हायरल

शिवसेनेच्या माजी नागरसेवकांचा ( Thane Corporator Video ) आपापसातला वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. महापालिका निवडणुका ( Thane Muncipal Corporation ) तोंडावर असताना निवडणुकीपूर्वीच शिवसेना पक्षातील वाद चव्हाट्यावर येत आहेत. ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे, ( Vikas Repale ) नम्रता भोसले ( Namrata Bhosale ) आणि नम्रता फाटक ( Namrata Fatak ) आणि राजू फाटक ( Raju Fatak ) हे एकमेकांना भिडल्याचा प्रकार समोर आला आहे.

Thane Corporator Video
Thane Corporator Video

By

Published : May 5, 2022, 5:10 PM IST

ठाणे -ठाण्यात शिवसेनेच्या माजी नागरसेवकांचा ( Thane Corporator Video ) आपापसातला वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. महापालिका निवडणुका ( Thane Muncipal Corporation ) तोंडावर असताना निवडणुकीपूर्वीच शिवसेना पक्षातील वाद चव्हाट्यावर येत आहेत. ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे, ( Vikas Repale ) नम्रता भोसले ( Namrata Bhosale ) आणि नम्रता फाटक ( Namrata Fatak ) आणि राजू फाटक ( Raju Fatak ) हे एकमेकांना भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, धक्काबुक्की, झटापट झाल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून सध्या हा व्हिडीओ ठाणेकर आणि राजकीयांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

दोन दिवसांपूर्वी झाला वाद -शिवसेना माजी नगरसेवक विकास रेपाळे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. तर, राजू फाटक हे सेना आमदार रवींद्र फाटक यांचे बंधू आहेत. यामुळे शिंदे आणि फाटक गटातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. ठाण्यातील रहेजा येथील मेट्रोच्या उड्डाण पुलाखाली शहर सौंदर्यीकरनाचे काम सुरू असून या कामावरूनच हा वाद झाला आहे. दोन दिवसांपूर्वी हा वाद झाला आहे. हा वाद एवढा विकोपाला गेला की त्यांनी एकमेकांना अश्लील भाषेत रस्त्यावरच शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्यात झटपटही झाली. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याने या वादाची जोरदार चर्चा ठाण्यात सुरु आहे.

प्रकरणाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल -माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले आणि माजी नगरसेविका नम्रता फाटक यांच्यात गेल्या काही वर्षांपासून अंतर्गत वाद सुरू आहेत. आणि आत्ताचा हा वाद एकाच ठिकाणी विकासकामनांतर्गत बांधण्यात आलेल्या ओपन जिम आणि पुटपाथ सुशोभीकरणावरून शिवसेना नगरसेवकांमधील अंतर्गत वाद हा समोर आला आहे. या प्रकरणाबाबत माजी नगरसेवक विकास रेपाळे यांना विचारणा केली असता आमदार रवींद्र फाटक यांचे बंधू राजू फाटक आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका नम्रता भोसले यांनी अगोदर मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, मी त्याला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला. तसेच याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे आमदार रवींद्र फाटक यांना याबाबतची तक्रार देखील केली असून विरोधकांना हाताशी घेऊन या प्रकरणाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल करून माझी बदनामी करण्याचा कट सध्या सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं आहे, तर राजू फाटक आणि नम्रता फाटक यांना याबाबत संपर्क केला असता आम्ही आमच्या वरिष्ठांना या बाबत तक्रार केली असून ते योग्य ती कारवाई करतील, असं सांगत माध्यमासमोर येण्यास त्यांनी टाळलं.

आमदार रवींद्र फाटक यांची प्रतिक्रिया- नगरसेविका नम्रता फाटक या रवींद्र फाटक यांचे छोटे भाऊ राजेंद्र फाटक यांच्या पत्नी आहेत. त्यांनी रवींद्र फाटक यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला होता. आपसातील भांडणे आहेत शिंदे साहेबांचा फोन आला आहे आणि त्यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही आम्ही आपापसात वाद मिटवू, असे देखील सांगितले ते म्हणाले.

चप्पल काढण्या इतपत झाला वाद -ठाण्यातील या दोन नगरसेवकांच्या वाद एवढा विकोपाला गेला की विकास रेपाळे यांना मारण्यासाठी चक्क चप्पल देखील उगरण्यात आली आहे. यावेळी अनेक माध्यस्थानी मध्ये पडल्याने हाणामारी झालीं नाही. मात्र, या प्रकारामुळे पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात चर्चेला उत आला.

सोमवारी फाडले पोस्टर -राजेंद्र फाटक यांनी नम्रता फाटक यांचे वाढदिवसाचा पोस्टर अज्ञात लोकांनी फाडले आणि तेव्हा पासून या परिसरात वाद वाढला आहे. आता या वादाला पालकमंत्री कसे हाताळतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

भाजपने घेतली उडी -नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता फाटक यांच्या वादाचा आणि धक्काबुक्कीचा व्हिडीओ भाजपने आयती संधी मिळाल्यामुळे चांगलाच व्हायरल केला. त्यासोबत सोशल मीडियावरदेखील हा पोस्ट केल्याने ठाण्यात यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा -Ajit Pawar On Raosaheb Danve : रावसाहेब दानवेंच्या विधानाला अजित पवारांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले... तृतीयपंथी पण...

ABOUT THE AUTHOR

...view details