ठाणे -ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आहे. या वर्षीचा सर्वाधिक उच्चांक हा गुरूवारी ठाण्याच्या नऊ प्रभाग समितीत नोंदविण्यात आला आहे. मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. गुरुवारी रुग्णांची संख्या १ हजार ४३२ ने वाढली असून मृतकाच्या आकड्यानेही उच्चांक प्रस्थापित केलेला आहे. मागील वर्षाच्या कोरोना रुग्णाच्या तुलनेत २०२१ मध्ये रुग्ण संख्या दुप्पट-तिप्पट झाल्याचे समोर आले आहे.
मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव फोफावला आणि लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात रुग्णसंख्येचा उच्चांक ६०० च्या आसपास होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या रुग्णांनी उच्चांक गाठल्याने आणि यंदाच्या सर्वाधिक मृत्यूच्या संख्येने एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी ठाण्यात १ हजार ४३२ नवे रुग्ण आढळले असून मागील दोन दिवसात रुग्णांचा आकडा हा हजाराच्या आसपास असतानाच गुरुवारी अचानक रुग्णसंख्या दीड हजाराच्या आसपास गेल्याने ठाणे पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे.
हॉस्पिटल्स हाउस फुल्ल
पुन्हा ठाण्यात कोविड रुग्णालये रुग्णांनी भरलेली असून नव्या रुग्णांची बेडसाठी हेळसांड होत आहे. आतापर्यंत ठाण्यात ६८ हजार ११ रुग्ण हे कोविड मुक्त होऊन घरी गेलेले आहेत. तर प्रत्यक्षात ठाण्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ९ हजार ९२२ एवढी आहे. गुरुवारी कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा आकडा ५७९ एवढा आहे. तर मृतकांचा आकडा ५ वर गेला आहे. २०२१ मधील मृतकांचा सर्वाधिक उच्चांक आहे. तर कोरोनाने मृत पावलेल्या रुग्णांचा आकडा १ हजार ३९५ एवढा झाला आहे. वाढती रुग्णसंख्या आणि मृतकांचा आकडा यामुळे ठाणे परिसरात खळबळ उडालेली आहे.
ठाण्यात कोरोना रुग्णांचा सर्वाधिक उच्चांक - Thane Corona Update
गुरुवारी रुग्णांची संख्या १ हजार ४३२ ने वाढली असून मृतकाच्या आकड्यानेही उच्चांक प्रस्थापित केलेला आहे. मागील वर्षाच्या कोरोना रुग्णाच्या तुलनेत २०२१ मध्ये रुग्ण संख्या दुप्पट-तिप्पट झाल्याचे समोर आले आहे.
ठाण्यात कोरोना रुग्णांचा सर्वाधिक उच्चांक