महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 28, 2021, 7:13 AM IST

Updated : Apr 28, 2021, 12:25 PM IST

ETV Bharat / city

ठाण्यातील प्राईम क्रिटी केअर रुग्णालयाला भीषण आग; चार रुग्णांचा मृत्यू

Thane : Fire took place at a hospital named prime hospital in kausa area. 3 patients died. There were 17 patients in hospital. CM has announced 5 lakhs funds to the close relatives of the demised. MLA jitendra Avhad said that a committe will be formed for enquiry.

thane-prime-hospital-fire-accident-updates-three-patients-died
ठाण्यातील कौसा परिसरातील रुग्णालयाला भीषण आग; चार रुग्णांचा होरपळून मृत्यू

12:24 April 28

ठाण्यातील प्राईम क्रिटी केअर रुग्णालयाला भीषण आग; चार रुग्णांचा मृत्यू

ठाण्यातील कौसा परिसरातील रुग्णालयाला भीषण आग; चार रुग्णांचा होरपळून मृत्यू

ठाणे :मुंब्रा भागातील कौसा परिसरात असलेल्या प्राईम क्रिटी केअर रुग्णालयाला आज पहाटे तीनच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे भांडुप, विरार पाठोपाठ याही रुग्णालयात उपचार घेणाऱ्या चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

रुग्णांचा मृत्यू आगीमुळे नाही, तर स्थलांतर करताना..

दरम्यान, या दुर्घटनेत दगावलेल्या रुग्णांचा मृत्यू आगीमुळे नव्हे तर स्थलांतर करताना उपचार न मिळाल्याने झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात एकूण २० रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांपैकी जनरल वॉर्डमध्ये १४ तर आयसीयूमध्ये सहा रुग्ण होते. ठाणे मनपाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

मृतांची नावे..

  • यास्मीन सय्यद (४६)
  • नवाब शेख (४७)
  • हलिमा सलमानी (७०)
  • हरीश सोनावणे (५७)

शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज..

मुंब्रा भागातील कौसा परिसरात असलेल्या प्राईम रुग्णालयात आगीची घटना घडली त्यावेळी २० रुग्णांवर उपचार सुरु होते. मात्र त्यातच आज पहाटे तीनच्या सुमारास अचानक शॉटसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज मंत्री आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. तर मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करून संबधित दोषींवर कारवाई करण्यात येईल अशीही माहिती मंत्री आव्हाड यांनी दिली आहे.

09:40 April 28

राजकारण बंद करा; शानू पठाण यांची घोषणाबाजी..

महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी किरीट सोमैया यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. रात्री घटनास्थळी रुग्णांना बाहेर काढायला आम्ही होतो, तुम्ही किंवा केंद्र सरकार त्यांना काहीही मदत करत नाहीये. त्यामुळे यावर आता राजकारण बंद करा, असे पठाण म्हणाले.

09:40 April 28

या तर ठाकरे सरकारच्या हत्या..

या तर ठाकरे सरकारच्या हत्या..

ठाण्यातील गेल्या आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे. रुग्णालयांमधील हे मृत्यू म्हणजे ठाकरे सरकारने केलेल्या हत्या आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारमधील नेत्यांनी आता बनवाबनवी करायचे सोडून बाहेर यावे, असे किरीट सोमैया यावेळी म्हणाले.

07:09 April 28

महाराष्ट्रात रुग्णालयातील आग आणि दुर्घटनेच्या घटना काही कमी होताना दिसत नाही. या वर्षात झालेल्या महत्त्वाच्या घटनांवर एक नजर -

विरार : विजय विल्लभ रुग्णालयातील आगीच्या घटनेत 15 रुग्णांचा मृत्यू..

विरारमध्ये एका रुग्णालयाला आग लागल्याची घटना २३ एप्रिलला घडली. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही दुर्घटना घडली. पहाटे तीनच्या सुमारास रुग्णालयाच्या आयसीयू विभागामध्ये ही आग लागली होती. याठिकाणी १७ रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेत एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकूण त्याच्या पत्निचेही ह्रदयविकाराने निधन झाले होते.  

सनराईज हॉस्पिटलमध्ये 11 रुग्णांचा होरपळून मृत्यू..

भांडूप येथील ड्रीम्स मॉलला २५ मार्च रात्री ११.४९ वाजता आग लागली. ही आग विझवण्यासाठी २३ तासांचा कालावधी लागला होता. या आगीत मॉलमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सनराईज हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटरवर असलेल्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. सनराईज हे 250 खाटाचे रुग्णालय पुन्हा सुरू करण्याची रुग्णालय प्रशासनाची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (२७ एप्रिल) झालेल्या सुनावणीत फेटाळली आहे.

नाशिकमध्ये ऑक्सिजन लीक.. 

नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळतीची घटना घडली होती. यात २४ जणांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात असलेल्या 20 हजार लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन टँकमधून ऑक्सिजनची गळती झाली होती. या रुग्णालयात 171 रुग्ण हे ऑक्सिजनवर होते आणि 21 जण व्हेंटीलेटरवर होते. ऑक्सिजन गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने 61 रुग्ण अत्यवस्थ झाले होते.  

भंडाऱ्यात शिशू केअर यूनिटला लागलेल्या आगीत चिमुरड्यांचा मृत्यू..

भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या शिशू केअर यूनिटला 9 जानेवारीच्या मध्यरात्री आग लागली होती. या जळीत कांडामध्ये भंडारा जिल्ह्यातील दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. शिशू केअर यूनिटमध्ये एकूण 17 नवजात बालके होती. त्या पैकी 7 बालकांना वाचविण्यात यश आले होते. आग लागली तेव्हा रूग्णालयात अन्य रुग्णही मोठ्या प्रमाणात होते. या घटनेचे देशभरात पडसाद उमटले होते. 

Last Updated : Apr 28, 2021, 12:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details