ठाणे - विदेशात बसून भारतातल्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली परिसरातील बिल्डर आणि व्यापाऱ्यांना खंडणीसाठी फोन करून करोडो रुपयांची खंडणी गोळा करण्याचा प्रकार करणारा गँगस्टर रवी पुजारी हा लवकरच ठाणे पोलिसांच्या कोठडीत दिसणार आहे. कर्नाटक पोलिसांनी रवी पुजारी ला सेनेगल मधून मागच्या वर्षी अटक केले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी रवी पुजारी वर असलेल्या गुन्ह्यांमध्ये रवी पुजारी ला ताब्यात घेतले, अशात ठाण्यात नवी मुंबईत आणखीनही गुन्हे प्रलंबित आहेत. ठाण्यातला जवळपास 30 गुन्ह्यामध्ये रवी पुजारी वॉन्टेड आहे. त्यापैकी सहा मोठ्या गुन्ह्यांमध्ये ठाणे पोलिस आता रवी पुजारी ला ताब्यात घेणार आहेत.
ठाणे पोलिसांनी सेनेगल मधल्या न्यायालयात रवी पुजारीच्या सहा गुन्ह्यांसाठी फ्रेंच भाषेमध्ये अर्ज दाखल केले. अशावेळी मुंबई आणि ठाण्यातील अशा पंधरा गुन्ह्यांमध्ये सेनेगल न्यायालयातून रवी पुजारीचा ताबा घेण्याची परवानगी पोलिसांना मिळाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत 2011साली एका बिल्डरवर झालेल्या गोळीबार प्रकरणात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, या आणि आणखी पाच गुण्यामध्ये ठाणे पोलिसांना रवि पुजारीचा ताबा मिळणार आहे.
दोन कोटी दे नाहीतर गोळ्या घालीन -
ठाण्यातील व्यवसायिक राकेश भगत याला 15 फेब्रुवारी 2018ला ऑस्ट्रेलिया वरून रवी पुजारीने फोन करून दोन कोटी दे नाहीतर गोळ्या घालीन अशी धमकी दिली होती. याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यातचा तपास ठाणे पोलिस करत आहेत. या मध्ये देखील रवी पुजारीला पोलीस ताब्यात घेणार आहेत.