ठाणे - लाॅकडाऊन शिथिल करून जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी राज्य सरकारने 'अनलाॅक-१' लागू केले. यामध्ये सोशल डिस्टन्स, तोंडाला मास्क वापरणे यांसारखे नियम सर्वत्र कायम आहेत. मात्र सार्वजनिक ठिकाणी नागरिक मास्क वापरत नसल्याचे समोर आले आहे. तसेच दुचाकीवरून एकावेळी दोन लोकांना फिरण्यास मनाई आहे. मात्र नागरिक नियम धाब्यावर बसवत दुचाकीवर डबलसीट फिरत आहेत. यामुळे शहर पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केलीय. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या दुचाकी जप्त करण्यास सुरुवात झाली आहे.
डबलसीट फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ठाण्यात वाहतुकीला शिस्त - ठाणे वाहतुक पोलीस
लाॅकडाऊन शिथिल करून जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी राज्य सरकारने 'अनलाॅक-१' लागू केले. यामध्ये दुचाकीवरून एकावेळी दोन लोकांना फिरण्यास मनाई आहे. मात्र नागरिक नियम धाब्यावर बसवत दुचाकीवर डबलसीट फिरत आहेत. यामुळे शहर पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केलीय.
ठाण्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या दुचाकी जप्त करण्यास सुरुवात झाली आहे.
शहरातील जांभळी नाका बाजार पेठ चौकात पोलिसांनी नागरिकांवर कारवाई केली. यावेळी अनेक नागरिकांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचे निदर्शनास आले.
लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांवर करवाई करण्यात आली होती. यावेळी हजारो दुचाकी जप्त करण्यात आल्या. आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नागरिकांना कामासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुचाकीवर डबलसीट फिरल्यास दंड आकारण्यात येणार आहे.